राहुल तोतवानीची पोलिस अधिकाऱ्यास मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

नागपूर :  रस्त्यावरच्या खांबाला कारने धडक दिल्याने कारवाई करीत असताना शिवसेनेचे वादग्रस्त नेते पंजू तोतवानी यांचे पुत्र राहुल याने सहायक पोलिस निरीक्षकास शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तुकडोजी चौक ते मानेवाडा रोडवर घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली.

नागपूर :  रस्त्यावरच्या खांबाला कारने धडक दिल्याने कारवाई करीत असताना शिवसेनेचे वादग्रस्त नेते पंजू तोतवानी यांचे पुत्र राहुल याने सहायक पोलिस निरीक्षकास शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तुकडोजी चौक ते मानेवाडा रोडवर घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली.

राहुल पंजू तोतवानी (21, रा. प्लॉट क्र. 141, सिंधी कॉलनी, खामला), राहुल रमेश चरडे (22, रा. रघुजीनगर) व अंकुश गोविंद गुप्ता (19, रा. सिंधी कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कार (क्र. एमएच 31 ईके 2223)ने तुकडोजी पुतळा चौक ते मानेवाडा चौकादरम्यानच्या रस्त्यावरील उभ्या खांबाला धडक दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना घडलेला परिसर हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीत येत असल्यामुळे अजनी पोलिसांनी घटनेची माहिती हुडकेश्वर पोलिसांना दिली. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण किसन आवटे हे पथकासह घटनास्थळी पोहोचले.

यावेळी तिन्ही आरोपी मद्यधुंदावस्थेत होते. आवटे यांनी वाहन चालविण्याचा परवाना आणि अन्य माहिती विचारली असता ते पोलिसांनाच दम देऊ लागले. वडिलाचे नाव सांगून आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी कारवाईकरिता वैद्यकीय चाचणीसाठी मेडिकल हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यासाठी पोलिस वाहनात बसविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की केली. राहुल पंजवानी याने एपीआय आवटे यांना मारहाण केली. त्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध मद्य प्राशन करून वाहन चालविणे, निष्काळजीपणातून अपघातास कारणीभूत ठरणे व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती हुडकेश्‍वर पोलिसांनी दिली.

पोलिसांवर दबाव?
पंजू तोतवानी यांचा राजकीय क्षेत्रात चांगलाच दबदबा आहे. यापूर्वीसुद्धा त्यांच्या मुलाने एका युवकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाची नोंद प्रतापनगर पोलिस ठाण्यात असल्याची माहिती आहे. राहुल तोतवानी याने पोलिस अधिकाऱ्याची कॉलर पकडून फरफटल्यानंतरही पोलिस ठाण्यात त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा पोलिस ठाण्यात होती.

विदर्भ

नागपूर - दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत विदर्भातील तीन महानगरपालिकांसाठी मंगळवारी (ता. 21) सरासरी 55 टक्के मतदान...

05.15 AM

नागपूर - महापालिकेच्या निवडणुकीत सरासरी 54 टक्के मतदान झाले असून, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता तब्बल 1,135 उमेदवारांचे...

05.15 AM

अकोला - प्रभाग क्र. १३ अ मधील भाजपचे उमेदवार सुजाता देवराव अहीर यांच्याकडे मंगळवारी सायंकाळी टाकलेल्या छाप्यामध्ये पाच डमी...

04.24 AM