फडणीस ग्रुपचे मालक विनय फडणीस अखेर गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

नाशिक - पुणेस्थित प्रसिद्ध फडणीस ग्रुपमध्ये आर्थिक गुंतवणुकीवर जादा व्याजदाराचे आमिष दाखवून नाशिकमधील गुंतवणूकदारांना सुमारे 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित विनय प्रभाकर फडणीस यांना मुंबईतील विक्रोळी परिसरात नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आज त्यांच्याविरोधात फसवणुकीचा पाचवा गुन्हा मुंबई नाका पोलिसात दाखल झाला. 

फडणीस ग्रुप अँड कंपनीज व फडणीस इन्फ्रास्ट्रक्‍चर या नामांकित पुण्याच्या फडणीस ग्रुपविरोधात गेल्या वर्षी नाशिकच्या गुंतवणूकदारांनी प्रथम आवाज उठविला होता; परंतु त्या वेळी विनय फडणीस यांनी गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे आश्‍वासन दिल्याने प्रकरण तिथेच थांबले होते. त्यानंतरही पैसे परत मिळत नसल्याने सरकारवाडा व मुंबई नाका पोलिसात गुन्हे दाखल झाले. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी विक्रोळीत फडणीस ग्रुपचे मुख्य संचालक विनय प्रभाकर फडणीस यांना अटक केली. फडणीस यांना आज नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. पठाण यांनी दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

उत्तर महाराष्ट्र

नाशिक/तळोदा/धुळे - गेल्या महिन्यापासून भाजून काढणाऱ्या तापमानानंतर आज दुपारी साडेचारच्या सुमारास नाशिक जिल्ह्यासह खानदेशात विविध...

12.54 AM

नामपूर - शहर व परिसरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळ कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू...

रविवार, 30 एप्रिल 2017

नाशिक - जगभरातील आश्‍चर्यकारक ठिकाणांपैकी असलेल्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, आयफेल टॉवर यांसह भव्य अशा महालाची प्रतिकृतीसह मनमोहनाऱ्या...

रविवार, 30 एप्रिल 2017