पॅनकार्ड क्‍लबकडून कोट्यवधींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

नाशिक : आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या गुन्ह्यात आणखी एका कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. पॅनकार्ड क्‍लब प्रा. लि. या हॉटेलिंग व बांधकाम क्षेत्रातील कंपनीविरोधात नाशिकमधील तक्रारदारांनी फसवणूक झाल्या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली असून, या प्रकरणी पोलिस तपास सुरू झाला आहे.

केबीसी, मैत्रेय, रोहिणी, पर्ल्स, इमू, हाउस ऑफ इन्व्हेस्टमेंट, फडणीस ग्रुप यांसारख्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले असताना, यात पॅनकार्ड क्‍लबची भर पडली आहे. पॅनकार्ड क्‍लब प्रा. लि. या नावाच्या कंपनीने गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून मासिक हप्त्यानुसार आर्थिक गुंतवणूक करून घेतली होती. मात्र, अडीच वर्षांपासून या कंपनीने गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकवरील परताव्याची रक्कम दिलेली नाही. या संदर्भात नाशिकमधील सुमारे 45 तक्रारदारांनी पोलिस आयुक्तालयात धाव घेऊन तक्रार दिली.
..............

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - सतत तोच तो अभ्यास अन्‌ पालकांकडूनही त्याचसंदर्भात होणारी सततची विचारणा, या साऱ्याला वैतागून तिघांनी मुंबईसारख्या...

12.18 AM

नाशिक - ज्येष्ठ लेखिका व समीक्षक-कथाकार विजया मंगेश राजाध्यक्ष यांना यंदाचा मराठीतील मानाचा "जनस्थान' पुरस्कार जाहीर झाला आहे....

गुरुवार, 19 जानेवारी 2017

नाशिक- नगरसेवक, राजकारणात आलो अन्‌ भरभराट झाली अशी बहुतांश नेते, नगरसेवकांची स्थिती असते. दुचाकीही नसलेले नगरसेवक झाले अन्‌...

गुरुवार, 19 जानेवारी 2017