गच्चीवर जाऊन पोलिस शोधणार नायलॉन मांजा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

गुन्हे दाखल करण्याच्या सूचना

नाशिक - दोन दिवसांपासून पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधातील मोहीम अधिक कठोर केली आहे. नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्यावरही पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. विक्रेता व त्याचा पुरवठा करण्यावर कठोर कारवाई केली जाईल. पतंग उडविणाऱ्यांनी नायलॉन मांजा वापरल्यास पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे.

गुन्हे दाखल करण्याच्या सूचना

नाशिक - दोन दिवसांपासून पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधातील मोहीम अधिक कठोर केली आहे. नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्यावरही पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. विक्रेता व त्याचा पुरवठा करण्यावर कठोर कारवाई केली जाईल. पतंग उडविणाऱ्यांनी नायलॉन मांजा वापरल्यास पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे.

नायलॉन मांजामुळे गेल्या दोन-तीन दिवसांत तीन-चार जण जखमी झाले असून, अंबडमधील एक गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली. नायलॉन मांजाच्या वापरावर सरसकट बंदी घातलेली असतानाही रोज पोलिसांच्या कारवाईत नायलॉन मांजा जप्त केला जातो आहे. आता त्यावर आणखी करडी नजर ठेवतानाच कठोर कारवाईचा बडगा पोलिसांकडून उगारला जाणार आहे. आतापर्यंत नायलॉन मांजाच्या विक्रेत्यांविरोधात कारवाई केली जात असताना, आता यापुढे या मांजाचा वापर करून पतंग उडविणारा आणि विक्रेत्याने ज्या ठिकाणावरून नायलॉन मांजा आणला, त्या वितरकावरही फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. तसे आदेशच आज पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी परिमंडल-1 चे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, परिमंडल-2 चे उपायुक्त श्रीकांत धिवरे यांना दिले. आयुक्तालय हद्दीतील तेराही पोलिस ठाण्यांत पतंग उडविणाऱ्या ठिकाणांवर जाऊन मांजाची तपासणी करून कारवाईचे संकेत आयुक्तांनी बैठकीत दिले. बैठकीला उपायुक्त दत्तात्रय कराळे, विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ व सचिन गोरे उपस्थित होते.

 

उत्तर महाराष्ट्र

नाशिक- नगरसेवक, राजकारणात आलो अन्‌ भरभराट झाली अशी बहुतांश नेते, नगरसेवकांची स्थिती असते. दुचाकीही नसलेले नगरसेवक झाले अन्‌...

06.09 PM

नाशिक - मराठा क्रांती मोर्चाची दिशा भरकटली असून, एकत्र येऊन समाजाने काय मिळवले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या...

04.24 AM

नाशिक - भारतीय जनता पक्ष प्रणीत महायुतीने एकत्र निवडणूक लढवावी, अशीच आमची भूमिका आहे. महायुतीच्या घटक पक्षांच्या समन्वय...

03.03 AM