निफाडचा पारा 5.4; नाशिक 6.5 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017
नाशिक : राज्यात सध्या थंडीची लाट कायम असून, राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे मंगळवारी 5.4 अंश सेल्सियस इतकी नोंदली गेली; तर नाशिकचाही पारा 6.5 अंश सेल्सियसपर्यंत घसरला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला आहे.

उत्तर भारतामध्ये सध्या कडाक्‍याची थंडी आहे; तर काश्‍मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये बर्षवृष्टी सुरू असल्याने देशभरात सध्या थंडीची लाट आली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवडाभरापासून किमान तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे. आजही पुन्हा राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे 5.4 अंश सेल्सियस इतकी झाली. शनिवारी (ता.7) देखील निफाड येथे 5 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले होते. मालेगावच्या किमान तापमानातही घट झाली असून, आज 8.4 अंश सेल्सियस; तर जळगाव येथे 9.6 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले.

उत्तर महाराष्ट्र

जळगाव - अक्षयतृतीयेला ‘सालदारकी’ ठरवायची अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम असली, तरी त्याचे प्रमाण वीस टक्‍क्‍यांवर आले...

03.57 AM

नाशिक -महिलांवरील हिंसाचार व अत्याचार कमी करण्यासाठी समाजातील घटकांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. महिला आयोग जिल्हा, तालुका पातळीवर...

03.03 AM

नाशिक - जादा व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी "मैत्रेय' फसवणूक प्रकरणप्रमाणेच एस्क्रो खाते...

03.03 AM