एकूण 3763 परिणाम
मे 01, 2017
भिवंडी - भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या २४ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी  जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांकडून युतीसाठी विरोध होत आहे. तरीही राज्य पातळीवर युतीसंदर्भात वाटाघाटी सुरू असल्याचे समजते. काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी न करता...
मे 01, 2017
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी ‘सकाळ’तर्फे सोमवारी (ता. १) अफलातून ‘वन डे फन डे’ आयोजित केला आहे. मुलामुलींसह पालकांना विविध उपक्रमांची आणि खेळांची भन्नाट मेजवानी देणारा हा उपक्रम म्हात्रे पूल परिसरातील कृष्ण सुंदर गार्डन येथे दुपारी ३ ते रात्री ९.३० या...
मे 01, 2017
कोपरखैरणे - ‘सकाळ तनिष्का’ सदस्यांसाठी दुचाकी आणि कार चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऐरोली सेक्‍टर आठमध्ये या प्रशिक्षण शिबिराचे शनिवारी (ता. २९) मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‌घाटन करण्यात आले. यात ३० महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आजच्या विज्ञान युगात...
मे 01, 2017
डोंबिवली -मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे डोंबिवलीत उद्या (ता. १) महाराष्ट्रदिनी सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानच्या मृणाल पाटोळे यांनी दिली. मराठी भाषेला ज्ञानभाषा बनविणे आणि मराठी...
मे 01, 2017
पुणे - बाहुली म्हटली की आपल्या डोळ्यांपुढे चटकन येते ती खेळण्यातली बाहुली. आपल्या लहानपणी मित्र-मैत्रीणींमध्ये खेळले जाणारे बाहुल्यांचे विविध खेळ. बाहुला-बाहुलीचं लग्न, छोटुशा बाळाला कंटाळा येऊ नये, म्हणून हातात दिली जाणारी बाहुली किंवा फारतर जरा मोठ्या वयात खेळायला हमखास असणारी बार्बी-डॉल... पण या...
मे 01, 2017
बिलोली - खासगी मिनीबस आणि वाळू भरलेल्या डंपरची धडक होऊन बसचालकसह पाच जण ठार; तर दहा जण जखमी झाले. बिलोली-नांदेड राज्य मार्गावरील कासराळीजवळ रविवारी (ता. 30) हा अपघात झाला.  पुण्यातील स्वारगेट परिसरातील कडतन कुटुंबीय नातेवाइकांसह एका कार्यक्रमासाठी खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या मिनीबसद्वारे (एमएच 12...
मे 01, 2017
इंदापूर/नातेपुते - आजोती (ता. इंदापूर) येथे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत चार डॉक्‍टर बुडाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी पाच वाजता घडली. त्यापैकी एका डॉक्‍टरचा मृतदेह मिळाला असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे. जीवरक्षक जॅकेट परिधान न करता होडीतून खोल पाण्यात गेलेल्या या...
एप्रिल 30, 2017
नाशिक - जगभरातील आश्‍चर्यकारक ठिकाणांपैकी असलेल्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, आयफेल टॉवर यांसह भव्य अशा महालाची प्रतिकृतीसह मनमोहनाऱ्या दृष्यानी सजलेल्या लंडन पॅलेसमध्ये आजचा "सकाळ-कलांगण'चा उपक्रम आयोजित केला होता. उपक्रमात सहभागी चित्रकारांनी कॅनव्हासवर थेट स्टॅच्यु ऑफ लिबर्टीपासून तर...
एप्रिल 30, 2017
दाहक उन्हाळा सुसह्य होतो, तो अमृतासमान रुचकर छान पिकलेल्या पिवळ्याधमक सुगंधी आंब्यामुळे. मग फक्त आमरसच नव्हे तर त्या रसाचे अनेक चवदार पदार्थ बनवले जातात. आमरसामुळे अंमळ वजन वाढत असले तरी मंडळी आमरस आणि त्याचे विविध चविष्ट पदार्थ खाण्यात मुळीच हयगय करीत नाहीत. आंबा हे आबालवृद्धांचे अत्यंत आवडीचे फळ...
एप्रिल 30, 2017
मुंबई - जगातील सर्वाधिक वजन असलेल्या ईमान अहमदच्या प्रकरणात आता राजकीय शिरकाव होऊ लागला आहे. शायना एन.सी. यांनी ईमानची बहिण शायमा हिने केलेले आरोप तद्दन खोटे असून या प्रकरामुळे महाराष्ट्रातील मेडिकल टुरिझमला धक्का पोहोचण्याची शक्‍यता असल्याचे मत व्यक्त केले. भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या शायना...
एप्रिल 30, 2017
वळवाने बळिराजा सुखावला : सावळजमध्ये वीज पडून दोन शेळ्या जखमी सांगली - गेल्या काही दिवसांत तापमानामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी, ग्रामस्थांना आज वळवाच्या अचानक हजेरीने दिलासा दिला. सकाळपासूनच सुरू झालेल्या उकाड्याने अवकाळीच्या आगमनाची चाहूल दिली होती. दुपारच्या सुमारास तासगाव, कवठेमहांकाळ,...
एप्रिल 30, 2017
कोल्हापूर - साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आणि यशवंत ॲकॅडमीतर्फे शुक्रवारी (ता. ५) ऑनलाइन सीईटी परीक्षा होणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी सीईटी होत असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.  सकाळ माध्यम समूह या उपक्रमाचे प्रायोजक आहे....
एप्रिल 30, 2017
पुणे - '‘आधार कार्ड-मोबाईल-बॅंक’ या सांधणीतून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळतानाच भ्रष्टाचारालासुद्धा आळा बसणार आहे, हे खरेच; मात्र निश्‍चलीकरणानंतरच्या आणि कॅशलेसला पाठबळ देण्याच्या काळात जो माहितीसाठा (डिजिटल डेटा) निर्माण केला जात आहे, त्याच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र कायद्याची आवश्‍यकता निर्माण...
एप्रिल 30, 2017
आजच ‘मधुरांगण’चे सभासद व्हा आणि मिळवा ‘दोघी’ नाटकाचे तिकीट पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत दिवसभर गॅझेट्‌समध्ये गुंतून राहण्यापेक्षा काही तरी नवीन शिकायला मिळणार, स्वत:च्या हाताने नवीन गोष्टी करायला मिळणार, या उत्साहातून ‘सकाळ-मधुरांगण’ने आयोजिलेल्या एकदिवसीय ‘किड्‌स कार्निव्हल’मध्ये ७ ते...
एप्रिल 30, 2017
येरवडा कारागृह, मनोरुग्णालय वसाहतीमधील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात वडगाव शेरी - कारागृह आणि मनोरूग्णालय परिसरातील शासकीय वसाहतीच्या सांडपाणी वाहिन्या व मैलापाणी वाहिन्या तुंबल्या आहेत. सांडपाणी वाहून जात नसल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच...
एप्रिल 30, 2017
छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गेल्या सोमवारी (२४ एप्रिल) केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर निर्घृण हल्ला चढवत २३ जवानांचा बळी घेतला. नक्षलवाद्यांकडून असे हल्ले वारंवार होत आहेत. नक्षलविरोधी मोहिमेच्या प्रणालीत संपूर्णतः बदल करण्याची घोषणा या हल्ल्यानंतर केंद्रीय...
एप्रिल 30, 2017
  पालवी म्हणाली ः ‘‘तुम्ही गुड फ्रायडेची तारीख आणि वार शोधला आहे आणि एप्रिल महिन्यात किती दिवस असतात, हे तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणजेच गुड फ्रायडे आणि एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस या दोहोंमध्ये ‘टिंब टिंब’ दिवसांचं अंतर आहे, तो दिवस म्हणजे ‘टिंब टिंब’ वार आहे.’’   आज एप्रिल महिन्यातला शेवटचा...
एप्रिल 30, 2017
आइस्क्रीम म्हणजे खाद्यानंदाचा परमोच्चबिंदू. रंग, रस, स्वादानं सगळ्या जगाला भुरळ घालणारा, काळाबरोबर बदलणारा आणि जिथं जाईल तिथल्या चवी स्वीकारत सदैव तरुण राहणारा हा पदार्थ. गोठणं हा चैतन्याचा अंत मानला जातो; पण गोठलेलं आइस्क्रीम मात्र गेली कित्येक शतकं खाद्ययात्रेला चैतन्य देत आलं आहे. या अफलातून...
एप्रिल 29, 2017
पुणे-  'आधार कार्ड-मोबाईल-बॅंक' या सांधणीतून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळतानाच भ्रष्टाचाराला सुद्धा आळा बसणार आहे, हे खरेच. मात्र, निश्‍चलनीकरणानंतरच्या आणि कॅशलेसला पाठबळ देण्याच्या काळात जो मोठ्या प्रमाणावर माहितीसाठा (डिजिटल डेटा) निर्माण केला जात आहे, त्याच्या सुरक्षिततेसाठी आता स्वतंत्र...
एप्रिल 29, 2017
पिंपरी - सोनेखरेदी हा भारतीयांचा आवडता विषय. विविध सण-समारंभांच्या निमित्ताने सोनेखरेदी केली जाते. त्यातील एक सण म्हणजे अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हा मुहूर्त साधत आज (शुक्रवारी) नागरिकांनी सोन्याची मोठी खरेदी केली. सराफ बाजार दिवसभर गर्दीने फुलून गेला होता. गुढीपाडव्यापेक्षा आज जास्त...