एकूण 435 परिणाम
फेब्रुवारी 28, 2017
नागपूर - शहराचे महापौरपद महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून, नगरसेविकांमधून महापौरांचा शोध अद्याप सुरू आहे. भाजपने आता उपमहापौरपदही नगरसेविकांमधूनच देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. महापौर व उपमहापौरपदही नगरसेविकाच राहणार असल्याने भाजप नागपुरात मिशन महिला बळकटीकरण राबवित असल्याची चर्चा रंगली आहे...
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - गुणवत्ता असूनही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी न मिळालेल्या राजिंदर गोयल तसेच पद्माकर शिवलकर या दोन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांचा भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षीक पुरस्कार सोहळ्यात  ‘सी. के. नायडू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. पतौडी स्मृती व्याख्यान आणि पुरस्कार सोहळा...
फेब्रुवारी 28, 2017
धुळे  - मालमत्ता कर थकबाकीवरील शास्ती माफीच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली. आज पहिल्या दिवशी 15 लाख रुपये कर भरणा झाला. गेल्या वर्षीही पहिल्या दिवशी साधारण अशीच स्थिती होती. सहा मार्चपर्यंत शास्तीवर 50 टक्के सूट आहे. दरम्यान, मालमत्ताधारकांची कर भरण्यासाठी महापालिकेत गर्दी झाली होती. ...
फेब्रुवारी 28, 2017
कणकवली - गेली पंधरा वर्षे रखडलेल्या जिल्हातील अर्धवट स्थितीतील मध्यम आणि लघुपाटबंधारेची कामे यंदाही निधीअभावी रखडली आहेत. केवळ आश्‍वासने आणि आकड्यांच्या खेळात सरकारने याही वर्षी कोकणच्या तोंडाला पानेच पुसली आहेत.  राज्यातील जलसंपदा विभागाच्या काही प्रकल्पामध्ये कोट्यवधीचा आर्थिक गैरव्यवहार उघड झाला...
फेब्रुवारी 28, 2017
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौरपदी पाच वर्षांत सहा नगरसेवकांना संधी मिळावी, म्हणून एका सदस्याला फक्त दहा महिने संधी देण्याचा विचार भाजपमध्ये सुरू आहे.  महापालिकेत  १२८ पैकी ७८ सदस्यांचे संख्याबळ भाजपचे असल्याने महापौर-उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह सर्व विषय समित्यांवरही भाजपचे...
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - सर्वसामान्य नागरिकांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडातर्फे यंदाही घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मेमध्ये काढण्यात येणाऱ्या लॉटरीत सुमारे 900 घरांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये ठाण्यातील वर्तकनगर आणि विरारच्या बोळिंज येथील घरे असणार आहेत...
फेब्रुवारी 28, 2017
‘सकाळ’ सांगलीचा वर्धापन दिन - भावे नाट्यमंदिरात आयोजन - अतुल कहाते यांचे व्याख्यान - वाचकांचा स्नेहमेळावा    दैनिक ‘सकाळ’च्या सांगली कार्यालयाचा ३३ वा वर्धापन दिन मंगळवारी (ता. २८) सायंकाळी ५.३० वा. साजरा होत आहे. सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीत ‘सकाळ’ने नेहमीच कृतिशील योगदान दिले आहे....
फेब्रुवारी 28, 2017
सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने गठित केलेल्या उपसमित्यांवरील निवडी बेकायदा असून त्या रद्द कराव्यात, अशी तक्रार माजी सभापती भारत डुबुले यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली.  उपसमितीमध्ये स्वीकृत सदस्यांना घेता येत नाही. कवठेमहांकाळ दुय्यम बाजार आवारच्या सभापतिपदी दादासाहेब कोळेकर यांची...
फेब्रुवारी 27, 2017
नवी दिल्ली: दिल्ली विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांत संघर्ष सुरू असताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आज कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. जेटली हे 1975 रोजी दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व करताना बंडखोरांची आघाडी केली होती का, असा सवाल...
फेब्रुवारी 27, 2017
यंत्रांमधील घोळाबाबत तक्रार करणाऱ्या अन पक्षातल्याच लोकांनी विरोधी प्रचार केल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनो आणि पक्षनेत्यांनो... आता तरी जागे व्हा. आपला पराभव नक्की कशामुळे झाला, हे समजण्यास तुम्हाला जितका उशीर लागेल, जितके उशिरा तुम्ही भानावर याल. तितका जादा वेळ...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - उल्हासनगर महापालिका शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवून स्थानिक साई पक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याच्या भाजपचा मानस होता. मात्र शिवसेनेने आक्रमक खेळी करीत स्थानिक साई पक्षाचे नगरसेवकच फोडण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे मागील दोन दिवसात साई पक्षाच्या चार नगरसेवकांसोबत शिवसेनेच्या वरिष्ठ...
फेब्रुवारी 27, 2017
मूलतः मराठी भाषेची प्रकृती संघर्ष करीत पुढं जाण्याची आहे. या तिच्या स्वभावामुळंच ती सतत वर्धिष्णू राहिली. ती कुठंही आटून, थिजून वा मावळून गेली नाही. ती सतत युयुत्सू राहिली. स्वतःची अन्वर्थकता प्रकट करीत राहिली. मागल्या किमान हजार वर्षांत तिनं मराठी भाषकांना जीवनात कसं उभं राहावं आणि उज्ज्वल...
फेब्रुवारी 27, 2017
सैन्यदलात कॅप्टन असलेले तिचे वडील युद्धात मारले गेले, तेव्हा ती अवघी दोन वर्षांची होती. ते युद्ध होतं, 1999 सालचं, कारगिलचं. परिणामी, पाकिस्तानचा द्वेष करीतच ती लहानाची मोठी झाली. सहा वर्षांची असताना तिनं एका बुरखा घातलेल्या महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. शेजारच्या शत्रुराष्ट्राचा इतका...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक लढलेल्या सुमारे 2200 उमेदवारांपैकी सुमारे 1100 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. ही एकूण रक्कम 38 लाख 37 हजार 500 रुपये आहे.  महापालिकेच्या सर्व 227 मतदारसंघांची अधिकृत आकडेवारी अजून हाती आलेली नाही. 35 प्रभागांमधील उमेदवारांच्या मतांचे आकडेही अजून हाती आलेले...
फेब्रुवारी 27, 2017
कोल्हापूर - जिल्हा परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाला पाठिंबा देणार हे कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच ठरवणार असल्याचे आज खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काढलेली गोफण ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पिकावर बसणाऱ्या पाखरांसाठी असल्याचेही...
फेब्रुवारी 27, 2017
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिवसेना कोणती भूमिका घेणार, याचा निर्णय गुरुवारी (ता. 2) कोल्हापूर दौऱ्यावर असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होईल. या निवडणुकीचा निकाल व तालुकानिहाय झालेल्या परिस्थितीसंदर्भात आज जिल्हाप्रमुखांनी सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्याशी चर्चा...
फेब्रुवारी 27, 2017
सोलापूर - अनेक ठिकाणी विरोधी पक्ष सर्वच दृष्टीने कमकुवत असतानाही त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. सकृतदर्शनी ‘ईव्हीएम’मध्ये भाजपच्या उमेदवारांना फायदेशीर व्हावे, अशा पद्धतीने सेटिंग झाल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी शहरातून व जिल्ह्यातून अनेक उमेदवारांकडून येत आहेत. तरी याची...
फेब्रुवारी 26, 2017
रत्नागिरी - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची येथील विशेष कारागृहातील अंधारकोठडी, शिरगाव येथील ज्या घरात ते वास्तव्यास होते ती खोली आजही जशीच्या तशी घरमालक दामले यांनी जतन करून ठेवली आहे. सावरकरप्रेमी पर्यटक येथे येऊन रोमांचित होतात. रत्नागिरी ही स्वातंत्र्यवीरांची कर्मभूमी होती. त्यांनी...
फेब्रुवारी 26, 2017
महाराष्ट्राच्या राजकारणाला केवळ कलाटणीच देणारे नव्हे, तर संपूर्ण राजकारणाची ‘कूस’ बदलून टाकणारे निकाल १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये दिसले आहेत. ‘कमळा’च्या विजयी झंझावातानं आता राज्याच्या राजकारणात ‘देवेंद्रपर्वा’ची मजबूत उभारणी झाल्याचं शिक्‍कामोर्तबच केलं आहे. या यशाचं नक्की इंगित काय...
फेब्रुवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेत 84 जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेससोबत गुप्त वाटाघाटी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यांनी कॉंग्रेसला...