एकूण 12 परिणाम
जानेवारी 18, 2017
पुणे - नियोजित पुरंदर विमानतळासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, तांत्रिक विश्‍लेषणाचा अहवाल येत्या पंधरा दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर भूसंपादनासाठीच्या पॅकेजच्या चारही पर्यायांचा तपशील तयार करून तो जागामालकांपुढे मांडण्यापर्यंतची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता उठेपर्यंत...
जानेवारी 11, 2017
बांदा - इन्सुली-माडभाकर येथील शेतकरी लक्ष्मण भदू पोपकर यांच्या सुमारे 14 एकर बागायतीला आग लागली. दुपारी लागलेल्या आगीत आंबा, काजू, नारळ व अन्य झाडे जळून खाक झाली. ऐन पीक हंगामात बागायतीला आग लागल्याने पोपकर यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. कोणीतरी...
जानेवारी 08, 2017
सलग तीन वर्षे दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या जालना जिल्ह्याने यंदा पावसाची सरासरी ओलांडली. दमदार पावसामुळे नदी-नाले-तुडुंब भरून वाहिले. बागायतदार शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला. कडवंची (ता. जालना) ग्रामस्थांनी तब्बल ४५० शेततळी व लोकसहभागातून केलेले पंधरा किलोमीटर नाला खोलीकरणच्या मदतीने मदतीने...
जानेवारी 07, 2017
रत्नागिरी - धीरुभाई अंबानी यांची ८४ वी जयंती, रिलायन्स फांउडेशनचा वर्धापन दिन यानिमित्त महिला, पशुपालक, मच्छीमार शेतकऱ्यांसाठी ज्ञानगंगा कार्यक्रम भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात झाला. या कार्यक्रमासाठी ‘सकाळ’ने माध्यम प्रायोजकत्व दिले होते. सुरवातीला रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत...
जानेवारी 07, 2017
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जुले ते ऑक्‍टोबर २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीचा फटका जिल्ह्यातील १६० गावातील १९८९ शेतकऱ्यांना बसला. यात शेती, फळपीक व शेतजमीन असे मिळून २६३ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी या...
जानेवारी 06, 2017
तमदलगेत दोन वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने बंधारे बांधले. ते बंधारे यंदा तुडुंब भरले. सभोवतालच्या शेतीबरोबरच बंधाऱ्यालागतच्या विहिरी व कूपनलिकांचे पाणी त्यामुळे समाधानकारक राहिले. त्याचा फायदा सुमारे साठ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांना झाला. राज्यातील मुबलक पावसाचा जिल्हा ही कोल्हापूरची ओळख; मात्र...
जानेवारी 06, 2017
युरोपातील शेतमालाच्या बाजारपेठेवर इस्राईलचा दबदबा आहे. तेथे ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊनच पीकउत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातून मुंबई-पुणे महानगरांसह देशभरातील बाजारपेठा आणि परदेशात शेतमाल निर्यातीची संधी आहे. पुण्याचे ७५ टक्के क्षेत्र जिरायती आहे, तेथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्‍य आहे.  ‘जिरायती’त...
जानेवारी 06, 2017
लातूर - गेली तीन वर्षे दुष्काळाचा सामना केल्यानंतर या वर्षी अतिवृष्टीमुळे हातात आलेले खरिपाचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले होते. यात शासनाकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. पण ती अद्याप मिळालेली नाही. शासनाच्या निकषानुसार जिल्ह्यात झालेल्या नुकसानीसाठी 344 कोटी रुपये मिळणे अपेक्षीत आहे. हे पैसे कधी...
जानेवारी 05, 2017
दापोली - डिसेंबरअखेरीस थंडीचा कडाका वाढला होता. मात्र, नववर्षात पारा विक्रमी घसरला आहे. आज या थंडीच्या मोसमातील 10.1 अंश सेल्सिअस अशी नीचांकी नोंद झाली. यापूर्वी दापोलीतील किमान तापमान 11, 12 आणि 23 डिसेंबरला 11 अंश सेल्सिअस इतके खाली आले होते. ऑक्‍टोबरच्या शेवटी दापोलीत थंडी जाणवू लागली....
जानेवारी 03, 2017
सरकार औद्योगिक क्षेत्रात 'मेक इन इंडिया'चा डंका वाजवीत आहे; मग शेती क्षेत्रामध्ये 'मेक इन इंडिया' का नाही? जर देशातील ६० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे तर शेती क्षेत्रात मेक इन इंडिया आधी करायला हवे. शेतीमालाला भाव देण्यासाठी आयात शेतीमालावर सरकारने वाढीव कर लावावा. उद्योगांना व परराष्ट्रातील...
डिसेंबर 11, 2016
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्तिमान झालेल्या शरद जोशी या नेत्याची पाहिजे तेवढी दखल घेतलीच गेली नाही. शरद जोशी यांची भूमिका समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांच्या मांडणीची चर्चा करायला हवी. बदलत्या परिस्थितीचा आणि स्वतः जोशी यांच्या आकलनशक्तीचा परिणाम म्हणून...
डिसेंबर 02, 2016
नागपूर - अवकाळी पाऊस, गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी रब्बीतील पिकांना पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमा लागू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना 31 डिसेबरपर्यंत पीकविमा काढता येणार आहे. सध्या रब्बीचा हंगाम सुरू असून, पिकांचा विमा उतरविण्यासाठी...