एकूण 2125 परिणाम
एप्रिल 29, 2017
चिपळूण : आंब्याची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक विक्रेत्यांनी आंबा पिकण्यासाठी कार्बाईडचा मारा सुरू केल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने पाहणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.  जिल्ह्यात...
एप्रिल 29, 2017
मुंबई - विदर्भ आणि मराठवाड्यात जाण्याची तयारी असेल तरच पदोन्नती या दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाचा अधिक विस्तार करीत आता मानवी निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या तालुक्‍यात जायची तयारी असेल तरच साहेब बनता येणार आहे. संपन्न जिल्ह्यातील मागास तालुक्‍यातील महत्त्वाची पदे कर्मचाऱ्यांच्या...
एप्रिल 29, 2017
दगड, माती, मुरमासाठी डोंगरांचा वेगाने होतोय ऱ्हास औरंगाबाद - मोठे प्रयत्न करुनही अल्पसे यश मिळाले तर "डोंगर पोखरून उंदीर काढणे' अशी म्हण वापरली जाते. प्रत्यक्षात डोंगर पोखरून बरेच काही साधते, हे क्रशरवाल्यांना चांगलेच माहीत आहे. त्यांच्यासाठी डोंगर म्हणजे पैशांची खाणच. त्यामुळे दगड, माती,...
एप्रिल 29, 2017
मुंबई - शेती क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी 2017-18 या खरीप हंगाम वर्षाचे उत्पादकता वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी आवश्‍यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून, सर्वांनी शेतकऱ्यांची सेवा म्हणून काम करावे. "उन्नत शेती - समृद्ध शेतकरी' या...
एप्रिल 29, 2017
दुकान स्‍थलांतरासाठी मालकांची पळापळ; रस्‍ते हस्तांतरात प्रचंड अडथळे कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली दारू दुकाने, परमिट रूम, वाइन शॉपसह कंट्री लिकरची दुकाने बंद झाली. यावर अजूनही निर्णय झालेला नाही आणि तो होणारही नाही हे स्पष्ट झाल्याने या बंद...
एप्रिल 29, 2017
राज्यातील 70 पैकी 28 खासदारांनीच निवडली गावे मुंबई - "सांसद आदर्श ग्राम' योजनेतून ग्रामीण भागातील गावे खासदारांनी दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. या योजनेनुसार गावे निवडण्याची दुसऱ्या टप्प्यातील मुदत जून 2016 रोजी संपली....
एप्रिल 29, 2017
प्रशासनाकडे माहितीचा अभाव; स्थायी समितीसमोर ९८ लाखांचा प्रस्ताव पुणे - पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, पावसाळी गटारांची दुरुस्ती आणि साफसफाईची कामे हाती घेण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. मात्र सध्या नेमकी किती लांबीच्या नाल्यांची दुरुस्ती गरजेची आहे, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही....
एप्रिल 29, 2017
मुंबई : आयसीसीने महसूलच्या विभागणीच्या टक्केवारीवरून भारतीय क्रिकेट मंडळाला त्रिफळाचीत केल्यानंतर बीसीसीआयनेही चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या सहभागावरून कडक भूमिका कायम ठेवली आहे. सर्व आव्हानांचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत, असे क्रिकेट प्रशासन समितीचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केले...
एप्रिल 28, 2017
नवी दिल्ली : 'राजनाथसिंह तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर तुम्ही केवळ हुतात्म्यांच्या मृतदेहांना श्रद्धांजली वाहू नका. त्यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली द्याल तेव्हा त्यांना बरं वाटेल,' असे सुनावत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका जवानाने देशवासीयांनी जवानांचे दुःख समजून घ्यावे, असे आवाहन केले आहे.  सुकमा...
एप्रिल 28, 2017
मुंबई : सुकमा येथे हुतात्मा झालेल्या 25 जवानांच्या मुलांचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने उचलली आहे. तसेच, हुतात्म्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन अभिनेता अक्षय कुमार आणि सोनम कपूर यांनी केले आहे.  छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव...
एप्रिल 28, 2017
लखीमपुरखेरी (उत्तर प्रदेश) : विवाह समारंभात बीफ न वाढल्याने सासरकडील मंडळींनी नवविवाहित महिलेला तलाक देण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पीडित महिला, तिचे पिता आणि भाऊ न्यायाच्या आशेने अनेक पोलिस स्थनकांमध्ये हेलपाटे मारत आहेत. पीडित महिलेचा विवाह झाल्यानंतर विवाहनंतरच्या समारंभासाठी पिता बहारीच...
एप्रिल 28, 2017
शिकागो : युनायटेड एअरलाईन्समधील विमान कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी एका विमान प्रवाशाला विमानाबाहेर काढले होते. या प्रकरणी संबंधित प्रवाशासोबत युनायटेड एअरलाईन्सने मैत्रीपूर्ण तडजोड केली असून नुकसानभरपाई म्हणून काही रक्‍कमही अदा केली आहे. शिकागो येथील विमानतळावरून डेव्हिड...
एप्रिल 28, 2017
उस्मानाबाद - आरोग्य केंद्रात होणाऱ्या दुर्लक्षामुळे रुग्णांना अनेकवेळा मरणयातना सहन कराव्या लागतात. येथील शासकिय महिला रुग्णालयातही गुरुवारी (ता.२७) असाच संतापजनक प्रकार घडला. सकाळी नऊपासून प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या मातेला रुग्णालय प्रशासनाने दाखल करुन घेतले नाही. अखेर दुपारी तीन वाजता तिने...
एप्रिल 28, 2017
९०० जणांचे अर्ज ः शिक्षक, नोकरदार, राजकारणातील व्यक्तींचा समावेश कोल्हापूर - एक काळ असा होता की देहदान, नेत्रदान आणि रक्तदान करा म्हणून जनजागृतीसाठी शिबिरे, मेळावे घ्यावे लागत होते. आज नेमकी उलटी स्थिती असून नेत्रदान आणि रक्तदानाबरोबरच देहदान करण्यासाठीही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देह...
एप्रिल 28, 2017
नाशिक - महापौर रंजना भानसी यांच्याच प्रभागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महापौर भानसी यांनीच टंचाईचे वास्तव अधिकाऱ्यांसमोर मांडून हतबलता व्यक्त केली. पंचवटी विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढ करण्याबरोबरच गळती थांबविण्याच्या सूचना त्यांनी आज प्रशासनाला...
एप्रिल 28, 2017
पुणे - मंगळवारी दुपारी रणरणत्या उन्हातून चालत जाणाऱ्या ७० वर्षीय आजी पिण्याचे पाणी शोधत होत्या. त्यांची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या ‘वॉटर एटीएम’वर पडली. ‘वॉटर एटीएम’मधले थंडगार पाणी पिऊन आजी सुखावल्या. अशा असंख्य कष्टकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांची तहान भर उन्हाळ्यात भागविण्याचे...
एप्रिल 28, 2017
भिवंडी - भिवंडी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी येथील पोलिस दल सज्ज झाले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी हिटलिस्टवर असलेल्या गुन्हेगारांवर हद्दपार व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. प्रथम टप्प्यात गुंडांना हद्दपार करण्यात...
एप्रिल 28, 2017
मुंबईतील 96 टक्के नमुने दूषित मुंबई - रस्त्यांवरील उसाचा रस, फळांचा रस, लस्सी, ताक यातील बर्फाचा गारवा जीवघेणा ठरण्याचा धोका आहे. मुंबई महापालिकेने तपासलेल्या बर्फाचे तब्बल 96 टक्के नमुने दूषित आढळले आहेत. 14 प्रभागांतील 100 टक्के नमुने दूषित होते. 75 टक्के बर्फात "ई कोलाय' हा विषाणू आढळला...
एप्रिल 28, 2017
नागपूर - रस्त्याच्या मधोमध असलेल्या धोकादायक वीजखांबांची समस्या "सकाळ'ने उजेडात आणताच प्रशासन खडबडून जागे झाले. महाराजबाग मार्गावरील यमदूत तातडीने हटवून घेतल्याने या रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला आहे.  स्मार्ट सिटीच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या नागपूर शहरात रस्ते रुंदीकरण व...
एप्रिल 28, 2017
खेड - गेल्या काही दिवसांत पारा कमालीचा चढला आहे. पाणीटंचाईचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. सद्यःस्थितीत तालुक्‍यातील २० गावे व ३३ वाड्या पाणीटंचाईच्या वणव्यात होरपळून निघत आहेत. धनगरवाड्यांची अवस्था सर्वाधिक भीषण आहे. काही जणांवर स्थलांतराची वेळ आली आहे. घशाला पडलेली कोरड शमवायची कशी या...