एकूण 261 परिणाम
मार्च 27, 2017
बंगळूरमधील सास्केन टेक्‍नॉलॉजी कंपनी बहुराष्ट्रीय. शेकडो कर्मचारी तिथं काम करतात. आयटी हब म्हणून नावारूपाला आलेल्या बंगळूरची खरी ओळख ही बागांचं शहर अशीच. आता भारतातील आयटी पंढरी असा तिचा लौकीक. या 'सास्केन'नं आपल्या आवारातील पडीक चार एकर जागेचा पुरेपूर वापर करायचं ठरवलं. तसं पाहिलं तर अनेक...
मार्च 27, 2017
महाड - प्लॅस्टिक प्रदूषणाच्या विळख्यापासून किल्ले रायगडाला मुक्त करण्यासाठी ‘रायगड रोपे-वे कंपनी’तर्फे या संपूर्ण पर्यटन हंगामात ‘रिकामी प्लॅस्टिक बाटली द्या आणि बदल्यात एक रुपया घ्या’ अशी योजना राबवली जात आहे. किल्ले रायगडावर दररोज येणाऱ्या हजारो पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा गडावर...
मार्च 26, 2017
बर्लिन : जर्मनीमधील शास्त्रज्ञांनी अतिउच्च क्षमतेचे अनेक स्पॉटलाइट एकत्र तयार केलेला कृत्रिम सूर्य 'सुरु' केला आहे. 'सिनलाइट' असे या प्रयोगाचे नाव असून जर्मनीतील युलीश येथे त्याची अंमलबजावणी होत आहे. प्रदूषणमुक्त ऊर्जानिर्मिती करणे, हा प्रयोगाचा मुख्य उद्देश आहे. या प्रयोगासाठी जगातील...
मार्च 26, 2017
पुणे - वाढत्या वाहनसंख्येमुळे शहराची प्रदूषण पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शनिपार चौकात जनता सहकारी बॅंकेजवळ बसविलेल्या हवा प्रदूषण नियंत्रक यंत्रणेचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते शनिवारी उद्‌घाटन झाले. अमोल चाफेकर यांनी ही यंत्रणा विकसित...
मार्च 26, 2017
भारतीय विज्ञानक्षेत्रांची ओळख करून घेताना पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालय जाणून घेणंही आवश्‍यक ठरावं. कारण, या मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या अकादमी, महामंडळं, संशोधनसंस्था आणि अन्य विभागांची संख्या ६० पेक्षाही जास्त आहे. आज अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या मंत्रालयाची स्थापना १९८५ मध्ये झाली...
मार्च 25, 2017
भारतातील सर्वात पवित्र मानली जाणारी प्रदूषित गंगा आणि आपल्या संस्कृतीचं संचित वागवणारी यमुना या दोन नद्यांना उत्तराखंड उच्च न्यायालयाने जिवंत माणसांचा दर्जा दिला आहे, तो उत्तम निर्णय झाला.सोलापूर जिल्हावासीयांसाठी भीमा नदी शुद्ध होणं महत्त्वाचं आहे.भीमाई जिवंत करण्यासाठी सरकारबरोबरच सर्वसामान्य...
मार्च 25, 2017
सावंतवाडी - न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्याविरोधात आता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी फटाके, वाद्य, स्पीकर लावणे आता गुन्हा ठरणार आहे.  याबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत, अशी माहिती येथील...
मार्च 25, 2017
भंडारा - तलाव, नद्या, बोड्या व जंगल यामुळे समृद्ध असलेल्या जिल्ह्याचे तापमान काही वर्षांपासून सातत्याने वाढत चालले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व वाहनांचे प्रदूषण नाही. तरीही येथील नागरिकांना वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगबाबत जागरूकता...
मार्च 24, 2017
जलसंपदा ही ईश्‍वरदत्त असली, तरी तिचा फायदा घेताना तिच्या संरक्षणाची, व्यवस्थापनाची, तसेच तिच्यावर अवलंबून असलेल्या पर्यावरणाची जबाबदारी ही सरकार व जनता यांच्या सहकार्यातून पार पडायला हवी. दरवर्षी मार्च महिना हा जलसंपदेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. चौदाला ‘आंतरराष्ट्रीय नदी दिवस’ तर २२ला ‘...
मार्च 23, 2017
हवामानामध्ये तीव्र बदल होत असून, दुष्काळ, गारपीट, अनियमित व अवेळी पाऊस, थंडी, उष्ण तापमान यांची तीव्रता वाढत आहे. महाराष्ट्रात वारंवार झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे हवामानातील बदल व त्याचे कृषी क्षेत्रावरील परिणाम याविषयी जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता वाढत आहे. या वर्षीच्या...
मार्च 23, 2017
बीड - तापमानात दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीमुळे आता जलस्रोत कोरडे पडत आहेत. उन्हाळ्यात पक्ष्यांच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी "यिनर्स'च्या पुढाकाराने जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून शहरातील महाविद्यालयांत चिमणगाथ बसवण्यात आले.  शहरातील बंकटस्वामी महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य मिरगणे यांच्या...
मार्च 23, 2017
सातारा - बेफिकीरीमुळे शांत आणि हवेशीर साताऱ्याची ओळख आता पुसू लागली आहे. आवाज, धुराच्या प्रदूषणाबरोबरच आता पोवई नाका परिसरात हवेतील धुलिकणांनी मर्यादा ओलांडली असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत आढळले आहे.  राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोव्हेंबर २०१६ मध्ये राजवाडा...
मार्च 23, 2017
शेऱ्यातील जॅकीसह चार युवकांची निर्मिती; बॅटरीवर चालणार, इंधनात होणार बचत रेठरे बुद्रुक - दिवसागणिक वाढत चाललेल्या डिझेल, पेट्रोलच्या दराने वाहनधारकांच्या खिशाला चांगलीच कात्री लावली जात आहे. यात वाहनधारकांना दिलासा मिळावा व त्यांची इंधन खर्चातून सुटका व्हावी, या हेतूने शेरे (ता. कऱ्हाड) येथील जॅकी...
मार्च 22, 2017
कोल्हापूर - राज्यातील नद्या आणि जलस्रोतांच्या प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्थिती चिंताजनक असून, त्याचे विपरीत परिणाम आरोग्य आणि पर्यावरणावर होत आहेत. जलप्रदूषण रोखण्यासाठी गावपातळीपासून सामूहिक तसेच वैयक्तिक पातळीवरही विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. सरकारी पातळीवर जलस्रोतांचे...
मार्च 22, 2017
पुणे - ‘‘राज्याच्या १९७६ च्या जलाधिनियमाची नियमावली अद्याप झालेली नसल्याने जलसिंचन क्षेत्रात घोटाळ्यांना वाव मिळत आहे. पाण्याच्या बाबतीत आपले समाजमन आणि आपला व्यवहारही पाखंडी झाला आहे,’’ अशा कठोर शब्दांत लेखक मिलिंद बोकील यांनी मत व्यक्त केले.  ‘रोटरी जलोत्सव’मध्ये आयोजित व्याख्यानात ‘पाणी आणि...
मार्च 22, 2017
नाशिक - महापालिकेतर्फे 1 मे महाराष्ट्र दिनापासून घराघरांतून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे वेगळा न केल्यास अशा नागरिकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या चुकीला पाचशे रुपये, तर दुसऱ्या चुकीनंतर प्रत्येकी एक हजार रुपये...
मार्च 21, 2017
नाशिक - जगाला पाणीटंचाईच्या समस्येला 2040 पर्यंत समोरे जावे लागेल, असे यापूर्वीचे अनुमान होते. मात्र, जानेवारीत प्रसिद्ध अहवालात ही समस्या दहा वर्षे लवकर 2030 पासून भेडसावेल, असे सूतोवाच केले आहे. पाण्याचे नियोजनबद्ध वापर करणारा देशच महासत्ता होऊ शकेल. भविष्यात पाणीवापरावरून शहरी व ग्रामीण भाग...
मार्च 21, 2017
पिंपरी - मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी ते दापोडी दरम्यानचा बीआरटीएस मार्ग फक्‍त दुचाकी वाहनांसाठी सोमवारपासून (ता.20) खुला करण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप यांनी निगडी ते दापोडी हा बीआरटीएस मार्ग दुचाकीसाठी खुला करण्याची मागणी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली होती. त्यानुसार, आयुक्त वाघमारे...
मार्च 20, 2017
मुंबई - वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर वन विभागाने चिमण्यांचा चिवटिवाट टिकवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जीवसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या चिऊताईचे अस्तित्व टिकवण्यासाठी नेचर फॉरेव्हर सोसायटी व इला फाऊंडेशन यांच्या सहकार्याने वन विभाग ठाणे, तसेच...
मार्च 19, 2017
कोल्हापूर : हातगाडी असो अथवा प्लास्टिक विकणारा; यापुढे प्लास्टिक पिशवीतून (कॅरीबॅग) वस्तू घालून दिली की त्यास महिन्याला चार हजार रुपये महापालिकेकडे जमा करावे लागणार आहेत. प्लास्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी वेगळी शक्कल लढविली असून, थेट विक्रेत्यांकडून रक्कम घेण्याचा निर्णय केंद्र तसेच राज्य शासनाने...