एकूण 740 परिणाम
एप्रिल 28, 2017
मुंबई : सुकमा येथे हुतात्मा झालेल्या 25 जवानांच्या मुलांचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने उचलली आहे. तसेच, हुतात्म्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन अभिनेता अक्षय कुमार आणि सोनम कपूर यांनी केले आहे.  छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव...
एप्रिल 28, 2017
९०० जणांचे अर्ज ः शिक्षक, नोकरदार, राजकारणातील व्यक्तींचा समावेश कोल्हापूर - एक काळ असा होता की देहदान, नेत्रदान आणि रक्तदान करा म्हणून जनजागृतीसाठी शिबिरे, मेळावे घ्यावे लागत होते. आज नेमकी उलटी स्थिती असून नेत्रदान आणि रक्तदानाबरोबरच देहदान करण्यासाठीही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देह...
एप्रिल 28, 2017
नाशिक -महिलांवरील हिंसाचार व अत्याचार कमी करण्यासाठी समाजातील घटकांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. महिला आयोग जिल्हा, तालुका पातळीवर जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविकांतर्फे घरोघरी पोचण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले.  राज्य महिला आयोग...
एप्रिल 28, 2017
लातूर - पुरुषप्रधान संस्कृतीत सातत्याने महिलांना मागे ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. हीच प्रवृत्ती गावच्या विकासाचा अडसर बनू पाहत आहे. गावे पाणंदमुक्त झाली तरच गावचा विकास होणार आहे. यात महिलांनी पुढाकार घेतला तरच गावे पाणंदमुक्त होतील, असा विश्वास पाटोदा (ता. औरंगाबाद) या आदर्श गावचे...
एप्रिल 27, 2017
कळंब - मुलीच्या वडिलाची सहा महिने दाढी, कटिंग व मुलीचे जावळ मोफत असा एक अनोखा उपक्रम कळंब येथील नाभिक तरुणाने सुरू केलेला आहे. समाजात वंशाचाच दिवा पाहिजे म्हणून मुलांच्या तुलनेत मुलीला दुय्यम दर्जा दिला जातो; मात्र दिवसेंदिवस मुलीचे घटते प्रमाण ही गंभीर बाब आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहिमेअंतर्गत...
एप्रिल 27, 2017
पुणे जिल्ह्यात मंचरच्या पूर्वेला सुमारे नऊ किलोमीटरवर डोंगराच्या पायथ्याला आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी गाव आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पिण्यासाठी गावात पाण्याचा टॅंकर मागवावा लागे. पावसाच्या पाण्यावरच येथील शेती अवलंबून होती. त्यामुळेच रोजगारासाठी येथील अनेक कुटुंबे पुणे, मुंबईला स्थलांतरित झाली होती...
एप्रिल 27, 2017
प्रशिक्षकांचा पुढाकार; गर्दी वाढल्याने जीवरक्षक पडू लागले अपुरे पिंपरी - नेहरूनगर येथील मगर जलतरण तलावावरील वाढत्या गर्दीमुळे जीवरक्षकांची संख्या अपुरी पडत आहे. यावर उपाय म्हणून जलतरण प्रशिक्षक आणि मित्रमंडळी यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत गेल्या दहा दिवसांत १५ जणांना...
एप्रिल 27, 2017
सावंतवाडी - पक्ष्यांचे संगोपन करणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना आता महिन्याकाठी दहा ते बारा हजार रुपये जास्तीचे मिळणार आहेत. त्यांना रोजगार मिळवून देणाऱ्या गोवा येथील रॉयल चिकन कंपनीने प्रत्येक किलोमागे एक रुपया वाढवून देण्याचे मान्य केले आहे. या प्रश्‍नाबाबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी...
एप्रिल 26, 2017
सोल - आण्विक महत्त्वाकांक्षेमुळे फुरफुरलेल्या उत्तर कोरियाला लगाम घालण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला असून, अमेरिकी लष्कराने दक्षिण कोरियामध्ये क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तैनात करण्यास सुरवात केली आहे. अमेरिकेच्या "टर्मिनल हाय ऍल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टीम'च्या (थाड) तैनातीमुळे...
एप्रिल 26, 2017
दुबई: कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री विनायक रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या 'ग्रंथ तुमच्या दारी' या वाचन चळवळीचा विस्तार भारतभर तर झालाच आहे; पण भारताव्यतिरिक्त जगाच्या विविध देशातही दर्जेदार मराठी ग्रंथ वाचकांपर्यत पोहोचवण्याचं काम या संस्थेने केले आहे. यूएईतील...
एप्रिल 26, 2017
राज्यातील शेतीच्या समस्येचे व्यामिश्र, वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप लक्षात घेऊन उपायही बहुस्तरीय असावे लागतील. शेतीतील उत्पादकतावाढीसाठी प्रयत्न करण्याला राज्यात भरपूर वाव आहे.  महाराष्ट्र या दख्खनच्या पठारावरील राज्यामध्ये पाऊस कमी तर पडतोच आणि पडतो तोही बेभरवशाचा असतो. त्यामुळे राज्यात पावसाच्या...
एप्रिल 26, 2017
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकाची नाडी मला माहीत आहे; म्हणूनच धनंजय, इकडं-तिकडं कुठे नादाला लागू नका, असा वडीलकीचा सल्ला आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना दिला.  संघर्ष यात्रेच्या निमित्ताने दसरा चौकात झालेल्या सभेत डॉ. कदम बोलत...
एप्रिल 26, 2017
रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यंदाही परंपरेनेनुसार शुक्रवारी (ता.२८) साजरी होणार आहे. भव्य मिरवणुका मंडळांच्या आकर्षण असल्या तरी उत्सवांतर्गत आठवडाभर विविध विधायक उपक्रम होणार आहेत. शिवचरित्रावर वैचारिक मंथन घडवतानाच आता शिवजयंतीच्या वर्गणीतून विविध सामाजिक उपक्रमांवर भर दिला जातो...
एप्रिल 26, 2017
अनेक नाती असतात, पण त्यातही मैत्रीचं नातं अधिक घट्ट असतं. कोणताही स्वार्थ मनात न ठेवता निरपेक्ष प्रेम करणारं मैत्र तुमच्या संघर्षाच्या दुखऱ्या काळात तुमच्यासंगे खडे असतं, आधारकाठीसारखं. निबोलकं. "मॅडम नमस्कार करते, पास होण्यासाठी आशीर्वाद द्या...'' परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थिनीने खाली वाकून...
एप्रिल 25, 2017
सोलापूर - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना विश्‍वासात घेऊन सल्लामसलत केली तर राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध होऊ शकते,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी येथे सूचित केले. पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापूरकरांच्या वतीने...
एप्रिल 25, 2017
लातूर - अनेक वर्षे शारीरिक कष्टाची कामे केली. प्रशासनात अधिकारी झाल्यापासून खुर्चीत एका ठिकाणी बसूनच कामकाज सुरू झाले. तेच श्रम आणि त्यालाच प्रतिष्ठा मिळत गेली; मात्र खऱ्या श्रमाचा आनंदच वेगळा असल्याचा प्रत्यय आला. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते व उपमुख्य कार्यकारी...
एप्रिल 25, 2017
88 कोटींचे थकीत कर्ज; तहसीलदारांची कारवाई राहुरी फॅक्‍टरी - तनपुरे सहकारी साखर कारखान्यातील यंत्रसामग्रीसह सर्व चल, अचल मालमत्ता आज जप्त करून नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या ताब्यात देण्यात आली. बॅंकेच्या सुमारे 88 कोटी रुपयांच्या थकीत कर्जापोटी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी ही कारवाई...
एप्रिल 25, 2017
काश्‍मीर खोऱ्याच्या सद्यःस्थितीची हृदयविदारक दृश्‍ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमांतून पाहिल्यानंतर अनेक विचारांनी आपल्या मनांमध्ये थैमान घातले आहे. काश्‍मीरमधील दहशतखोरांना आणि दगडफेक्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असेच सगळ्या वाचकांचे मत विविध प्रकारे व्यक्त होत आहे. थोडा खोलवर...
एप्रिल 25, 2017
प्रा. दत्तात्रेय इंगळे यांचा उपक्रम; वंचित मुले गिरवताहेत ‘अबकड’चे धडे पिंपरी - गुलबर्गा जिल्ह्यातील बेरड समाजातील कुटुंबं... गावाकडे हाताला काम नाही म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात आलीत... गेल्या अकरा वर्षांपासून भोसरी-दिघी परिसरातील मोकळ्या जागेत पालं ठोकून मिळेल ते काम करत जगण्यासाठी व जगवण्यासाठी...
एप्रिल 25, 2017
आपल्या घरी शिकवणीला येणारी एक मुलगी, भिशी ग्रुपमधली मैत्रीण महापौर झाल्यामुळे होणारा आनंद लपवण्यासारखा नाहीच. उलट आपल्या या मैत्रिणीच्या कौतुक सोहळ्यात रमायलाच हवे. माझ्या घरी पुण्याच्या महापौर येणार म्हणून लगबग सुरू होती. महापौर माझ्याच घरी येण्याचे कारणही तसेच होते. मी बी. एड्‌. झाल्यावर घरीच...