एकूण 402 परिणाम
एप्रिल 26, 2017
राज्यातील शेतीच्या समस्येचे व्यामिश्र, वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप लक्षात घेऊन उपायही बहुस्तरीय असावे लागतील. शेतीतील उत्पादकतावाढीसाठी प्रयत्न करण्याला राज्यात भरपूर वाव आहे.  महाराष्ट्र या दख्खनच्या पठारावरील राज्यामध्ये पाऊस कमी तर पडतोच आणि पडतो तोही बेभरवशाचा असतो. त्यामुळे राज्यात पावसाच्या...
एप्रिल 24, 2017
नवी दिल्ली: सार्वभौम सुवर्णरोख्यांची आजपासून (सोमवार) सुरू झाली आहे.  यासाठी सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 2901 रुपये निश्चित करण्यात आला आहे. ही माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. चालू आर्थिक वर्षातील सार्वभौम सुवर्णरोखे योजनेचा हा पहिला टप्पा असून 28 एप्रिलपर्यंत सुवर्णरोख्यांसाठी अर्ज करता येणार आहे....
एप्रिल 24, 2017
टी-20 क्रिकेट आणि शेअर बाजार या दोन्हीचाही समान स्थायिभाव आहे. तो म्हणजे चढ-उतार, चैतन्य आणि त्याचे सनसनाटीपण. प्रत्येक बॉलला प्रेक्षकांना हवी असते सिक्‍सर, बाउंड्री किंवा विकेट! शेअर बाजाराच्या बाबतीतही डेली ट्रेडरना पाहिजे असते निमिषार्धातील शंभर- दीडशे पॉइंटची वधघट! नाही म्हणायला बाजारात 'चिअर...
एप्रिल 24, 2017
नाशिक जिल्ह्यातील रामाचे पिंपळस येथील अशोक व जोत्स्ना या सुरवाडे युवा दांपत्याने केवळ आठ ते दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये ‘स्थानिक फॅब्रिकेटेड’ यंत्रसामग्रीचा वापर करीत द्राक्ष वाईन निर्मिती यशस्वी केली आहे. अलीकडील काळात शेतीतील समस्या वाढून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अशा वेळी इच्छाशक्ती,...
एप्रिल 23, 2017
संमोहन शास्त्र आणि उपचार प्रकाशक ः रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर / पृष्ठं ः २०८ / मूल्य ः २५० रुपये. संमोहन हे एक शास्त्र आहे आणि काही मानसिक आजारांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, असाही एक दावा केला जातो. डॉ. राजसिंह सावंत (०२३१-२५२३७७७) यांनी या संमोहनाविषयी वेगवेगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. मन...
एप्रिल 23, 2017
देशभरातील शहरे आणि महानगरांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस भयावह होत आहे. ही समस्या कशी सोडवता येईल या दृष्टीने अनेकांकडून कल्पना मांडल्या जात आहेत. सांगलीतील व्यावसायिक व वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. मेकॅनिक्‍स पदवीधर असलेल्या अविनाश माळी यांनी वर्गीकृत कचरा गोळा...
एप्रिल 23, 2017
'महाराष्ट्र राज्य नावीन्यता व स्टार्ट अप धोरण 2017' चा मसुदा मुंबई - नवनवीन संकल्पाचा वापर करून राज्यात उद्यमशीलता वाढीस लावणे, यातून तरुण उद्योजकांना चालना देत उद्योग-व्यवसायाची भरभराट करणे या हेतूने राज्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता या विभागाने "महाराष्ट्र राज्य नावीन्यता व स्टार्ट अप...
एप्रिल 20, 2017
नवी दिल्ली: मोबाईल वॉलेट कंपनी 'पेटीएम' आता जपानी गुंतवणूकदार सॉफ्टबँकेकडून सुमारे 1.2 अब्ज डॉलर ते 1.5 अब्ज डॉलरएवढा निधी मिळविण्याचा विचार करीत आहे. ही फेरी यशस्वी झाल्यास कंपनीचा प्रतिस्पर्धी फ्रीचार्जची खरेदी करण्याचा विचार आहे, अशी उद्योगवर्तुळात चर्चा सुरु आहे. ऑनलाईन बाजारपेठ फ्लिपकार्टने...
एप्रिल 20, 2017
४०७ कोटींची जिल्ह्यात गुंतवणूक २२६ उद्योजकांकडून सामंजस्य करार   पिंपरी - पुणे जिल्ह्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षात सूक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रातील उद्योजकांनी ४०७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, सुमारे सहा हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. उद्योजकांनी चाकण औद्योगिक क्षेत्राला...
एप्रिल 20, 2017
कवठेमहांकाळ - म्हैसाळ उपसा योजनेचा कारभार अनियंत्रित आहे. या योजनेच्या यंत्रणेची वाताहत झाली आहे. ती अशीच सुरू राहिली, तर शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होईल. आजपर्यंत पाणी योजनेवर कोट्यवधीचा खर्च झाला. तरीही कारभार नियोजनशून्य आहे. विद्युतपंपाच्या दुरुस्तीअभावी योजना बंद पडेल, अशी भीती माजी मंत्री...
एप्रिल 19, 2017
लोणावळ्यानजीक निसर्गरम्य परिसरात सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी वसवलेली ‘ॲम्बी व्हॅली’ लिलावात काढण्याचा आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असा दिलासा दिला आहे. आर्थिक गैरव्यवहार केले तरी इथल्या कायदा-व्यवस्थेचे हात आपल्यापर्यंत पोचत...
एप्रिल 19, 2017
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अतिशय क्‍लिष्ट अशी कारणे आहेत; परंतु निव्वळ कर्जमाफीची मागणी पुढे करून या प्रश्‍नाचे राजकारण केले जात आहे. खरी गरज आहे, मूलभूत उपाययोजनांची. ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ हा विषय गेल्या तीन दशकांपासून सुरू आहे व त्याला खतपाणी मिळत चालल्यामुळे आजपावेतो तीन लाखांपेक्षा जास्त...
एप्रिल 19, 2017
'एसपीं'ची कारवाई : निरीक्षक घनवटही लवकरच होणार निलंबित सांगली - वारणानगर येथे शिक्षक कॉलनीत घरफोडी करून नऊ कोटी 18 लाख रुपयांवर डल्ला मारणाऱ्या "एलसीबी'तील सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक कुलदीप कांबळे, रवींद्र पाटील...
एप्रिल 19, 2017
नाशिक - प्रगत तंत्रज्ञान, "सेबी'च्या नियंत्रणामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक आता पूर्वीप्रमाणे किचकट किंवा अवघड न राहता अधिक सुरक्षित व पारदर्शक झाली आहे, अशी माहिती ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी आज येथे दिली.  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ऍन्ड ऍग्रिकल्चर, सीडीएसएल (मुंबई) आणि...
एप्रिल 18, 2017
मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक- 'सेन्सेक्‍स' आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांक- 'निफ्टी' हे दोन निर्देशांक शेअर बाजारातील बहुतेक सर्व गुंतवणूकदारांना माहीत असतात. परंतु म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून या निर्देशांकामध्ये गुंतवणूक करता येते, हे थोड्या गुंतवणूकदारांना माहीत असते. अशा फंडांना '...
एप्रिल 18, 2017
हायकोर्टात जनहित याचिका; केंद्र सरकारला नोटीस मुंबई - विमा संरक्षण देणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) सिगारेट निर्मिती करणाऱ्या आयटीसी लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केल्याबद्दल उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. "एलआयसी'च्या या दुटप्पी धोरणाविरुद्ध टाटा व्यवस्थापकीय विश्‍...
एप्रिल 18, 2017
पिंपरी - भारतासारख्या शेतीप्रधान देशात अनादी काळापासून पशुपालन केले जाते. कोणत्याही प्रकारच्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या वैशिष्ट्यामुळे गरिबांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात शेळ्यांचा मोठा वाटा असतो. हीच बाब लक्षात घेऊन जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास...
एप्रिल 17, 2017
नवजात कन्यांच्या स्वागताचा जागर व गजर आटोपला असेल, लेकींच्या जन्माचे उत्सव संपले असतील, पुरेसे फोटोसेशन झाले असेल आणि "बेटी बचाव'च्या घोषणांनी समाधानाचे रांजण तुडुंब भरले असतील तर जरा अत्यंत कटू वास्तवाकडे वळूया. हे वास्तव म्हणजे या महाराष्ट्र देशी मुलींच्या जन्मदरात झालेली चिंताजनक घसरण. 2015 मधील...
एप्रिल 17, 2017
मुंबई - शेतीसाठी दिवसा बारा तास अखंड वीजपुरवठा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना केली.  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित या कार्यकमाचा दुसरा भाग सह्याद्री वाहिनीवरून आज प्रसारित झाला. कार्यक्रमाच्या पहिल्या भागात...
एप्रिल 16, 2017
"मेक इन इंडिया'अंतर्गत कागद कारखान्यासाठी प्रयत्न नाशिक - कागद स्कॉटलंडचा, शाई युरोपातील, छपाई यंत्र जर्मनीचे आणि त्यावर नोट छापायची भारताची! वर्षानुवर्षे असे विदेशी तंत्रज्ञानावरील आधारित नोटांचे अर्थकारण चलनाची गरज भागवू शकत असले, तरी आर्थिक सुरक्षेशी मात्र तडजोडच होती. सामरिक...