एकूण 724 परिणाम
एप्रिल 29, 2017
पाली : पशू- प्राणी यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी ग्रामीण भागामध्ये प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत; पर्यायाने त्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होतो. म्हणून हातावर हात ठेवून सरकारी यंत्रणेला दोष न देता गेली 30 वर्षे गुरांवर उपचार करणाऱ्या मोहन गोविंद सावंत यांना शेतकरी डॉक्‍टरपेक्षाही...
एप्रिल 29, 2017
दगड, माती, मुरमासाठी डोंगरांचा वेगाने होतोय ऱ्हास औरंगाबाद - मोठे प्रयत्न करुनही अल्पसे यश मिळाले तर "डोंगर पोखरून उंदीर काढणे' अशी म्हण वापरली जाते. प्रत्यक्षात डोंगर पोखरून बरेच काही साधते, हे क्रशरवाल्यांना चांगलेच माहीत आहे. त्यांच्यासाठी डोंगर म्हणजे पैशांची खाणच. त्यामुळे दगड, माती,...
एप्रिल 29, 2017
मुंबई - शेती क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी 2017-18 या खरीप हंगाम वर्षाचे उत्पादकता वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी आवश्‍यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून, सर्वांनी शेतकऱ्यांची सेवा म्हणून काम करावे. "उन्नत शेती - समृद्ध शेतकरी' या...
एप्रिल 29, 2017
'एलबीटी'ची भरपाई देण्यास केंद्र सरकारचा नकार मुंबई - वस्तू आणि सेवा कर कायदा (जीएसटी) येत्या एक जुलैपासून देशभरात लागू होणार असून राज्यातील महापालिकांच्या स्थानिक संस्था कराची (एलबीटी) नुकसानभरपाई देण्यास केंद्र सरकारने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षाकाठी हजारो कोटी...
एप्रिल 28, 2017
नव्याने सुरू झालेल्या सेवेला मोठा प्रतिसाद नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या "उडान' योजनेअंतर्गत सुरू झालेल्या शिमला आणि दिल्ली दरम्यानच्या विमान सेवेची सवलतीची जूनपर्यंतची सर्व तिकिटे बुक झाली आहेत. सवलतीच्या विमान तिकिटांचा दर 2 हजार 36 रुपये आहे. सध्या या विमानाची तिकिटे विनासवलतीच्या दरात 5 हजार 300...
एप्रिल 28, 2017
4 लाख 90 हजार टन तुरीची लिलावाशिवाय विक्री मुंबई - खरेदी केंद्रांच्या माध्यमातून राज्य सरकारने सुमारे चार लाख टन तूर खरेदी केली असली, तरी याच काळात शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये त्याहून अधिक; म्हणजेच सुमारे चार लाख 90 हजार टन तूर विक्री केली आहे. या तुरीपोटी...
एप्रिल 28, 2017
मुंबई - राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी राज्यात पहिल्यांदाच तूर खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 22 एप्रिल 2017 पर्यंत खरेदी केंद्रांवर आलेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत होणार आहे, असे पणन मंत्री सुभाष...
एप्रिल 28, 2017
शिरपूर - ज्या पिकाने ७० वर्षे तारले, त्या भुईमुगात औत घालताना मरणयातना झाल्या; पण करायचे काय? कूपनलिका आटली. शेंगा भरल्याच नाहीत. भुईमुगाचा नुसता पालाच हाती आला. किमान बैलांना चारा होईल म्हणून नांगरटी करावी लागली... हे सांगताना ७० वर्षीय नवलसिंह राऊळ यांचे डोळे पाणावले होते. तऱ्हाड कसबे (ता. शिरपूर...
एप्रिल 28, 2017
कोल्हापूर - गेल्या वर्षी कमी झालेला पाऊस, त्यामुळे घटलेले उसाचे उत्पन्न यामुळे नुकत्याच संपलेल्या या वर्षीच्या साखर हंगामात राज्यात गेल्या वर्षीपेक्षा निम्मेच साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी राज्यात साखरेचे उत्पादन 84.15 लाख टन झाले होते. या वर्षी ते 41.80 लाख टनापर्यंत खाली आहे...
एप्रिल 28, 2017
"मॅंगोनेट' प्रणालीमुळे हापूसचे उड्डाण सोपे! मुंबई - कृषी पणन मंडळातर्फे सादर केलेल्या मॅंगोनेट प्रणालीमुळे बागायतीतून आंबा थेट परदेशांत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याला रशियात 800 रुपये प्रतिडझन दर मिळाला. नेदरलॅण्डमधूनही मागणी आली; परंतु रत्नागिरीतील "पणन'च्या प्रक्रिया हाउसला अद्याप...
एप्रिल 27, 2017
दुचाकी आणि चारचाकी वाहन परवाना देण्यासाठी असलेले निकष आहेत ते अधिकाधिक कठोर करायला हवेत. जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना वाहतुकीचे साधे नियम कसे पाळायचे हे माहीत असायला हवे. सद्यस्थितीत वाहतूक परवाना देण्यासाठी ज्या चाचण्या होतात त्या चाचण्यांची काठिण्य पातळी विशेष नाही. सर्वप्रथम या चाचण्या फक्त...
एप्रिल 27, 2017
देवरूख - नोकरी मिळत नसल्याने संगमेश्‍वर तालुक्‍यातील कळंबस्ते येथील तीन तरुणांनी आधुनिक पद्धतीने मत्स्यपालनाचा व्यवसाय करीत कोकणात मासेपालनाचा व्यवसायही उभारी घेऊ शकतो, हे सिद्ध केले आहे. कळंबस्ते येथील मज्जीद नेवरेकर, इनायत काजी आणि फिरोज नेवरेकर अशी या तरुणांची नावे आहेत. नोकरी शोधूनही सापडत...
एप्रिल 27, 2017
राज्यातील विरोधकांची संघर्ष यात्रा आज (गुरुवारी) सातारा जिल्ह्यात येत असून, कऱ्हाड, दहिवडी व सातारा येथे जाहीर सभा होणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या हेतूने संघर्ष यात्रेचा लढा सुरू आहे. जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेतेमंडळी या यात्रेत सहभागी होत आहेत. पश्‍चिम...
एप्रिल 27, 2017
धुळे - पुरेसे पाणी, मोठे रस्ते, गटारी, बहुमजली पार्किंग अशा मूलभूत सोयी-सुविधांची व्यवस्था निर्माण करतानाच पुढील 25-50 वर्षांचा विचार करावा लागेल व त्यातूनच शहराला "स्मार्ट सिटी'कडे घेऊन जाता येईल. यासाठी नागरिक, प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या सहभाग आणि सहकार्याची फार मोठी गरज आहे असा सूर "भविष्यातील...
एप्रिल 27, 2017
वसुलीच्या उद्दिष्टासाठी ठामपाची क्‍लृप्ती ठाणे - ठाणे महापालिकेने मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी यंदा युद्धपातळीवर बिले बनवून विशिष्ट मुदतीत कर भरणाऱ्या करदात्यांना चक्क दुप्पट सवलत (सूट) देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सन 2017-2018 चा मालमत्ता कर थकबाकीसह चालू वर्षाची रक्कम...
एप्रिल 27, 2017
नवी दिल्ली - शेती उत्पादनांवर कर लागू करण्याची सूचना निती आयोगाने केली असली तरी केंद्र सरकारचा असा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. जेटली यांनी आपल्या ट्‌विटर अकाउंटवर यासंबंधी प्रतिक्रिया दिली.  ट्‌विटर अकाउंटवर जेटली म्हणाले, की केंद्र सरकार कृषी...
एप्रिल 27, 2017
नवापूर - पाच टक्के पेसा अंतर्गत आर. ओ. जलशुद्धीकरण प्रकल्प सात लाख 50 हजार रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. प्रती तास दोन हजार लिटर शुध्दपाणी गावाला मिळेल. मोबाईलसारखे रिचार्ज एटीएम सिस्टिम आहे. 50 पैसे लिटर तसेच लग्नासह इतर कार्यक्रमासाठी थम्सची सुविधा केली आहे. शुद्ध पाण्यामुळे गावाचे आरोग्य...
एप्रिल 27, 2017
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या हेविवेट नेत्यांचे तसेच महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर. स्मार्ट सिटीसह मेट्रो रेल्वेसुद्धा येथे झपाट्याने विकसित होत आहे. नागरिकांच्या प्रचंड अपेक्षा असताना दुसरीकडे तिजोरीत फारसा पैसा नाही, अशा महापालिकेत नियुक्ती झाल्याने...
एप्रिल 27, 2017
खेड शिवापूर, जि. पुणे  - पाणीटंचाई आणि उन्हाच्या चटक्‍यामुळे वेळू (ता. भोर) येथील अनेक अंजिराच्या बागा जळून गेल्या आहेत. अंजिराचा ऐन हंगाम सुरू असताना हे नुकसान झाल्याने येथील अंजीर उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.  वेळू गावात मोठ्या प्रमाणावर अंजिराचे उत्पादन घेतले जाते. जवळपास घरटी...
एप्रिल 27, 2017
नवी दिल्ली - शशांक मनोहर कार्याध्यक्ष असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत एकटे पडलेल्या बीसीसीआयचा दोन मुद्यांवर दारुण पराभव झाला. आयसीसीने तयार केलेल्या प्रशासनाच्या आणि आर्थिक वाटा हिस्साच्या नव्या मॉडेलला विरोध करताना बीसीसीआय एकटे पडले.  आयसीसीमध्ये महत्त्वपूर्ण बदल...