ब्रेकिंग न्यूज

नवी दिल्ली : एनएसयुआयच्या विद्यार्थ्यांचे दिल्ली विद्यापीठाच्या कला शाखेबाहेर उपोषण सुरु. #RamjasRow

आता खा भाज्यांचे चॉकलेट! 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

आरोग्यदायी खाद्यपदार्थांमध्ये चॉकलेट किंवा बार स्वरूपामध्ये फळांचा समावेश सर्वमान्य झाला आहे. आता त्यात भाज्यांचाही समावेश करण्यात येत असून, भाज्यांच्या चॉकलेटना चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा उद्योजकांकडून व्यक्त होत आहे. 

आरोग्यदायी खाद्यपदार्थांमध्ये चॉकलेट किंवा बार स्वरूपामध्ये फळांचा समावेश सर्वमान्य झाला आहे. आता त्यात भाज्यांचाही समावेश करण्यात येत असून, भाज्यांच्या चॉकलेटना चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा उद्योजकांकडून व्यक्त होत आहे. 
अमेरिकेमध्ये नुकत्याच झालेल्या हिवाळ्यातील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांच्या शोमध्ये दॅटस् इट कंपनीच्या अशा चॉकलेटचा समावेश होता. त्याविषयी माहिती देताना ‘दॅटस् इट’ या कंपनीच्या कार्यकारी अधिकारी डॉ. लियार लेवन्झटेन यांनी सांगितले, की फळे आणि भाज्यांचा आहारामध्ये वापर वाढविण्याच्या उद्देशाने आम्ही काही उत्पादने विकसित केली आहेत. फळांच्या चॉकलेटना लोकांची चांगली मागणी असून, त्याचाच पुढील टप्पा म्हणून भाज्यांचा समावेश असलेली चॉकलेट किंवा बार आहेत. त्यामुळे लोकांचा त्यालाही चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. 

असे आहेत हे चोको बार 
सध्या हे बार वाटाणा किंवा गाजर, मका, सेंद्रिय शाबुदाणा, सेंद्रिय वनस्पतिजन्य ग्लिसरीन आणि समुद्री मीठ या पाच घटकांपासून बनवले जात आहेत. हे उत्पादन ग्लुटेनमुक्त आहे. भाज्यांतील पोषक घटक अत्यंत सोप्या व नावीन्यपूर्ण पद्धतीने आणण्यात आले आहेत. त्यामुळे लहान मुले आवडीने ते खातील. 
 

साय-टेक

  एस्टॅन्शिआ एल मस्टर (अर्जेंटिना) : दुर्मिळ समजले जाणारे आणि खगोलप्रेमी ज्याची...

11.57 AM

कॅलिफोर्निया - नोकियाच्या मोबाईमध्ये असणारा स्नेक गेम चांगलाच लोकप्रीय झाला होता. हाच स्नेक गेम आता फेसबुकवरही खेळता येणार आहे...

सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

कोची : इडुक्की जिल्ह्यातील इडाथट्टू आणि कन्नडिपारा भागात वनस्पतीच्या एका नव्या...

सोमवार, 27 फेब्रुवारी 2017