नव्या मानवी अवयवाचा शोध

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पचन संस्थेमध्ये हा अवयव असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी तो वेगवेगळ्या घटकांनी बनला असून, त्याची विस्कळित रचना असल्याचे मानले जात होते; परंतु हा अवयव उदरपोकळीच्या मागच्या भित्तीला आतड्यांशी जोडण्याचे कार्य करतो

लंडन - मानवी देहाची रचना त्याची निर्मिती आणि त्याचे कार्य या अतिशय जटिल अशा प्रक्रिया आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून यावर अविरत शोध सुरू असून, आता आयरिश शास्त्रज्ञांच्या एका चमूला मानवी देहात एक नवीन अवयव सापडला आहे. त्याला त्यांनी मेसेंट्री असे नाव दिले असून, मराठीत त्याला "अंत्रधर' असे म्हणता येईल.

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पचन संस्थेमध्ये हा अवयव असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी तो वेगवेगळ्या घटकांनी बनला असून, त्याची विस्कळित रचना असल्याचे मानले जात होते; परंतु हा अवयव उदरपोकळीच्या मागच्या भित्तीला आतड्यांशी जोडण्याचे कार्य करतो. लिमरिक विद्यापीठाचे प्राध्यापक आणि या संशोधनातील प्रमुख संशोधक जे. कॅल्व्हिन कॉफी यांनी याबाबतची माहिती "द लॅन्सेट गॅस्ट्रॉएंट्रोलॉजी अँड हेप्टॉलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध केली आहे.

अंत्रधर ही एक घडी असून ती पोट, छोटे आतडे, स्वादुपिंड, प्लिहा आणि अन्य अवयवांना उदराच्या भिंतीला जोडते. शोधादरम्यान हा एक अखंड अवयव असल्याचेही शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. अंत्रधराच्या आणखी अभ्यासामुळे काही शस्त्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही; तसेच गुंतागुंती कमी होण्यास व रुग्ण लवकर बरा होण्यासही मदत होईल, असे मत कॉफी यांनी नोंदविले आहे.

साय-टेक

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संयुक्तपणे करत असलेल्या प्रकल्प आज यशस्वी...

शुक्रवार, 20 जानेवारी 2017

ए हाऽऽय!  हाऊ आर यू यार?... हाऊ आर यू ऑल?...  कितने दिनों बाद मिल रहे हैं... दिन काय.. वर्षं... चांगली दोन वर्षं......

शुक्रवार, 20 जानेवारी 2017

जगभरात योगसाधनेचा प्रसार होत आहे. योग ही जीवनपद्धतीच असून, त्या मुळे शरीर व मन तंदुरुस्त राहते. अर्थात, योगसाधनेचे केवळ एवढेच...

शुक्रवार, 20 जानेवारी 2017