हलके तरीही शक्तिशाली 

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

न्यूयॉर्क :  जगातील सर्वाधिक शक्तिशाली आणि तरीही वजनाला अत्यंत हलक्‍या असलेल्या पदार्थाची रचना केली असल्याचे मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या (एमआयटी) शास्त्रज्ञांनी नुकतेच जाहीर केले आहे. ग्राफिन या कार्बनच्या रूपावर प्रक्रिया करून हा पदार्थ तयार करता येईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

न्यूयॉर्क :  जगातील सर्वाधिक शक्तिशाली आणि तरीही वजनाला अत्यंत हलक्‍या असलेल्या पदार्थाची रचना केली असल्याचे मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या (एमआयटी) शास्त्रज्ञांनी नुकतेच जाहीर केले आहे. ग्राफिन या कार्बनच्या रूपावर प्रक्रिया करून हा पदार्थ तयार करता येईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

केवळ एक अणू इतकी जाडी असलेले आणि मधमाश्‍यांच्या पोळ्यासारखी अणुंची रचना असलेले ग्राफिन हे कार्बनचे द्विमितीय रूप आहे. ग्राफिन हे दर्जेदार पोलादापेक्षाही दोनशे पट अधिक शक्तिशाली असते. उष्णता आणि विजेचा उत्कृष्ट वाहक असून, तो जवळपास पारदर्शक असतो. या ग्राफिनवर दाब देऊन आणि इतर प्रक्रिया करून या नव्या पदार्थाची रचना तयार करता येत असल्याचे "एमआयटी'च्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यांचा हा शोध सायन्स ऍडव्हान्स या जर्नलमध्येही प्रसिद्ध झाला आहे. हा नवा पदार्थ त्रिमितीय (थ्री डी) असून, जाळीदार स्वरूपात आहे. या पदार्थाच्या वैशिष्ट्यपूर्ण भौमितिक रचना पाहता, या पदार्थापेक्षाही हलके आणि शक्तिशाली पदार्थ तयार करता येण्याची शक्‍यता असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

ग्राफिनसारख्या पदार्थांमध्ये अनेक वैशिष्ट्ये असली तरी, असे पदार्थ आपल्याला जसेच्या तसे वापरता येत नाहीत. मात्र, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, वाहने आणि इतर उद्योगांमध्ये त्यांचा वापर उपयुक्त ठरतो. हा द्विमितीय पदार्थ त्रिमितीय केल्यास कसा असेल, हे समजून घेण्यात आम्हाला यश आले असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

टॅग्स

साय-टेक

बीजिंग - कार्बन डायऑक्‍साइडचे रूपांतर इंधनातील मूलभूत घटक असलेल्या मिथेनमध्ये...

12.39 AM

नवी दिल्ली - लोकप्रिय मेसेंजर ऍप 'व्हॉटसऍप' डिजीटल पेमेंट क्षेत्रात उतरण्याची शक्‍यता व्हॉटसऍपचे सहसंस्थापक ब्रायन ऍक्‍टॉन यांनी...

शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

व्हिडिओ कॉलिंग असेल किंवा ते इमेज पाठवण्याची मर्यादेत वाढ किंवा नवनव्या इमोजी असोत, व्हॉट्सऍप युजर्ससाठी नेहमीच नवीन काहीतरी...

शनिवार, 25 फेब्रुवारी 2017