संघाच्या नाराजीचा भाजपला फटका?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पक्षासाठी पुणे महापालिकेच्या प्रचारात सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पक्षाचे कमळ चिन्ह घेऊन संघ स्वयंसेवक आता घरोघरी जाणार नाहीत. 'भाजप हा आता मोठा पक्ष झाला आहे. त्याला दर वेळी संघाच्या मदतीची गरज नाही,' अशी अधिकृत भूमिका संघाचे पदाधिकारी सांगत आहेत. प्रत्यक्षात पुण्यातील उमेदवारी वाटपात संघाच्या शिफारशी भाजप नेत्यांनी काही ठिकाणी धुडकावलेल्या असल्याने संघाची नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे. 

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पक्षासाठी पुणे महापालिकेच्या प्रचारात सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पक्षाचे कमळ चिन्ह घेऊन संघ स्वयंसेवक आता घरोघरी जाणार नाहीत. 'भाजप हा आता मोठा पक्ष झाला आहे. त्याला दर वेळी संघाच्या मदतीची गरज नाही,' अशी अधिकृत भूमिका संघाचे पदाधिकारी सांगत आहेत. प्रत्यक्षात पुण्यातील उमेदवारी वाटपात संघाच्या शिफारशी भाजप नेत्यांनी काही ठिकाणी धुडकावलेल्या असल्याने संघाची नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे. 

भाजपने चांगल्या उमेदवारांना संधी द्यावी यासाठी पुण्यात संघाचा आग्रह होता. संघाने कोणाला उमेदवार द्यावी अथवा नाकारावी याबाबत थेट नावे सांगितली नसली तरी योग्य तो संदेश दिला होता. मात्र संघाने शिफारशी करूनही काही ठिकाणी विशेषतः कोथरूडमध्ये वादग्रस्त उमेदवार देण्यात आले. भाजपच्या निष्ठावंतांची उमेदवारी अखेरच्या क्षणी कापण्यात आली. अगदी मुख्यमंत्री कार्यालयाने तिकीट कापल्याचे या निष्ठावंतांना सांगण्यात आले.

नेत्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी न देण्याबाबतही संघ आग्रही होता. स्थानिक आमदारांनी संघाच्या कार्यकर्त्यांऐवजी इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना पायघड्या अंथरल्या, अशा प्रकारच्या तक्रारी झाल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संघाच्या स्वयंसेवकांनी सक्रिय भूमिका बजावली होती. त्याचा मोठा फायदा भाजपला झाला होता. त्याच पद्धतीने 'परिवर्तन' करण्यासाठी मात्र संघाने अद्याप ताकद लावलेली नाही. 

संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याविषयी थेट काही बोलण्यास नकार दिला. मात्र त्यांनी सैद्धांतिक मांडणी या निमित्ताने सांगितली. अर्थात ही मांडणीच त्यांची भूमिका स्पष्ट करणारी आहे. 'भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे संघाची दर वेळी त्यांना गरज असतेच असे नाही. संघ स्थानिक निवडणुकांत पक्षीय भूमिका घेऊन उतरत नसतो. संघाचे स्वयंसेवक भाजप सोडून इतर पक्षांतही असू शकतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी संघाचे स्वयंसेवक भाजपचेच काम करतील, असे चित्र दिसणार नाही. उमेदवारी वाटपाबाबत संघ केव्हाच आग्रही नव्हता. तरीही चारित्र्यवान मंडळी राजकारणात यावीत, याकडे संघाचा पहिल्यापासून कल आहे. मतदान जास्त व्हावे. ते देश कर्तव्य आहे. त्यामुळे जास्तीतजास्त मतदान होण्यासाठी संघाचे स्वयंसेवक प्रयत्नशील राहतील.'' 

याबाबत भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, 'संघाच प्रत्येक स्वयंसेवक दर वेळी निवडणूक प्रचारात उतरतो असे नाही. देशहित, पुण्याचे हित पाहून संघाचे स्वयंसेवक आपापल्या मर्यादेत काम करत भाजपला सहकार्य करीत असतात. आताही पुण्याचे हित पाहून संघाचे स्वयंसेवक योग्य ती भूमिका घेतील. काही ठिकाणी नाराजी असेल तर ती दूर केली जाईल. यात संवाद साधून गैरसमज दूर केले जातात. या वेळीही तसेच घडेल.'' 
या साऱ्या पार्श्‍वभूमीवर संघविचारांचा पगडा असलेल्या संस्था, बॅंका, महाविद्यालये येथे संघाने प्रचारात सहभागी व्हावे की नाही, यावरच चर्चा झडत आहेत. तरीही येत्या काही तासांत यावर मार्ग निघेल, असेही सांगण्यात आले

पुणे

अक्षय तृतीयेनिमित्त आयोजित मैफलीत रसिकांनी अनुभवला स्मरणरंजनाचा देखणा प्रवास पुणे - तीच गाणी, तेच संगीत आणि त्यातील प्रत्येक...

04.42 AM

पुणे - कृषी क्षेत्रात उद्योग सुरू करण्यासाठी मुबलक संधी, भरपूर वाव असून कृषी निगडित उद्योगाचे व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण...

04.39 AM

मधुरांगणचे सभासद व्हा आणि मिळवा ‘दोघी’ नाटकाची प्रवेशिका पुणे - ‘सकाळ मधुरांगण’ने मधुरांगण सभासद, त्यांचे कुटुंबीय व ‘सकाळ’...

04.30 AM