शालेय मुलीच्या खुनाचा तपास सुरू - पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

भिलवडी - माळवाडी (ता. पलूस) येथील शालेय मुलीच्या खूनप्रकरणातील 27 संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, मजबूत आरोपपत्र दाखल व्हावे यासाठी तपास सुरू असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

भिलवडी - माळवाडी (ता. पलूस) येथील शालेय मुलीच्या खूनप्रकरणातील 27 संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, मजबूत आरोपपत्र दाखल व्हावे यासाठी तपास सुरू असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पीडित कुटुंबीयांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. 'ही घटना अत्यंत निंदनीय आहे. पोलिस योग्य पद्धतीने तपास करीत असून, अंतिम निष्कर्षापर्यंत पोचले आहेत. खटला जलदगती न्यायालयात चालवून उज्ज्वल निकम यांच्यासारखे नामवंत वकील देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,'' असे पाटील म्हणाले. अशा घटनांमधून राजकारण करणे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे व तेढ निर्माण करणे अयोग्य आहे, असे सांगून

ते म्हणाले, 'गृहखाते सांभाळण्यास मुख्यमंत्री सक्षम आहेत. केवळ विरोध म्हणून कायदा-सुव्यवस्थेबाबत विरोधक टीका करीत आहेत. सर्व बाजूने सखोल तपास करीत आरोपींना फाशी दिली जावी असा प्रयत्न आहे.''

पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात संघर्ष यात्रा आली... नेत्यांनी भाषणे केली... आणि निघून गेली. तीन वर्षांपूर्वी तीन-तीन मंत्र्यांचं ऐश्‍वर्य या...

12.39 PM

ग्राहकांची झुंबड - सोने, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आणि डिझेल मोटारींना मिळाली पसंती कोल्हापूर - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर...

05.09 AM

श्रीरामपूर - 'संवाद यात्रा काढावी लागणे म्हणजेच तुमचा जनतेशी संवाद नाही, हे...

05.09 AM