बीड, जालना जिल्ह्यांत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017
औरंगाबाद - बीड आणि जालना जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. चंदनसावरगाव (ता. केज) येथील शेतकरी उद्धव आश्रूबा तपसे (वय 50) यांनी मंगळवारी (ता. 10) पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची दोन एकर शेती आहे, तर तडेगाव (ता. भोकरदन) येथील शेतकरी फकीरराव नऱ्हे (58) यांनी काल (सोमवारी) सायंकाळी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची पाच एकर जमीन असून, बॅंकेचे एक लाख रुपयांचे कर्ज आहे. नापिकीमुळे कर्जफेडीच्या विवंचनेतून या दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.

मराठवाडा

उमरगा - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सध्या देशपातळीवर चर्चेत असलेले खासदार प्रा. रवींद्र गायकवाड...

04.33 AM

औरंगाबाद - स्मार्ट सिटी प्रकल्पाची पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन समिती) म्हणून सीएचटूएम हिल इंटरनॅशनल लिमिटेडची नियुक्ती अंतिम...

04.30 AM

लातूर - महावितरणमधील वर्ग तीन व चार संवर्गातील लाईन फोरमन, मुख्य तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ आदी...

03.51 AM