बेकायदा बांधकाम भोवणार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017
एमआयएमच्या दोन नगरसेवकांना प्रशासनाने बजावल्या नोटीस
औरंगाबाद - बेकायदेशीर बांधकाम केल्याबद्दल महापालिका प्रशासनाने एमआयएमच्या दोन नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. या नोटिसीच्या उत्तरानंतर त्यांना नगरसेवक पद रद्द करण्यात का येऊ नये अशी नोटीस बजावली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एमआयएमच्या दोन नगरसेवकांना प्रशासनाने बजावल्या नोटीस
औरंगाबाद - बेकायदेशीर बांधकाम केल्याबद्दल महापालिका प्रशासनाने एमआयएमच्या दोन नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. या नोटिसीच्या उत्तरानंतर त्यांना नगरसेवक पद रद्द करण्यात का येऊ नये अशी नोटीस बजावली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिका कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामांना लोकप्रतिनिधींनी प्रोत्साहन देऊ नये. प्रत्येक वॉर्डातील नगरसेवकांनी बेकायदेशीर बांधकाम होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा असते; मात्र खुद्द नगरसेवकांनीच अनधिकृत बांधकाम केल्याने या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयएमच्या शहाबाजार वॉर्डाच्या नगरसेविका सरवत बेगम व नवाबपुरा वॉर्डाचे नगरसेवक फेरोजखान यांना अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. या नोटिसीच्या उत्तरानंतर अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल, तसेच या दोन्ही नगरसेवकांना अनधिकृत बांधकामाबद्दल नगरसेवक पदासाठी अपात्र का ठरवण्यात येऊ नये अशा आशयाची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 10 "ड' ची नोटीस बजावण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. एमआयएमचे नगरसेवक फेरोजखान यांना या पूर्वीच महापालिका आयुक्‍त ओम प्रकाश बकोरिया यांनी अशा आशयाची नोटीस बजावली आहे. फेरोज खान व त्यांच्या भावाने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना त्यांच्या दालनात जाऊन धमकी दिली होती, या अशोभनीय वर्तनाबद्दल आयुक्‍तांनी त्यांना यापूर्वी आपणांस अपात्र का ठरवू नये अशा आशयाची नोटीस बजावली आहे.

श्री. चहल यांनाही नोटीस
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांचे म्हाडा वसाहतीमध्ये घर आहे. त्यांनी घरावर अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्या आधारे श्री. चहल यांनाही अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मराठवाडा

औरंगाबाद - मालमत्ता कराची वसुली नाही, पाणीपट्टीचे रेकॉर्ड नाही, यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी दुसरा...

04.12 AM

लातूर - जिल्हा परिषद व दहा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. 23) सकाळी दहा वाजता प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी...

03.12 AM

औरंगाबाद - तरुण शेतकऱ्याला अपघाताने गाठले आणि गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूचे कार्य थांबल्याचे (...

02.12 AM