मेकअप उतरविणे कंटाळवाणे : सोनम

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

बॉलिवूडमध्ये अभिनयाचा ठसा उमटविणारी सोनम कपूर "फॅशन आयकॉन' म्हणनूही प्रसिद्ध आहे. तिच्या "ड्रेसिंग सेन्स'ची चर्चाही सतत होत असते. एखाद्या पार्टीत अथवा कार्यक्रमास सोनम हजर असल्यास उपस्थितांच्या नजरा तिच्याकडेच वळतात.

तिची वेशभूषा, केशभूषा सर्वांपेक्षा "हटके' असते. त्याला साजेशा मेकअपमुळे तिच्या सौंदर्यात भरच पडते. असे असले तरी पार्टीनंतर मेकअप उतरविण्याचे काम तिला अजिबात आवडत नाही.

चित्रपट पुरस्काराच्या एका कार्यक्रमात तिने ही गोष्ट जाहीर केली. या कार्यक्रमात तिने पफ बाह्यांचा काळा गाऊन घातला होता. तिची केशरचनाही अत्यंत आकर्षक होती. पार्टीसाठी खास ड्रेसिंग, मेकअप करणे आपल्याला आवडते, पण त्यानंतरचे मेकअप चेहऱ्यावरून उतरविणे कंटाळवाणे असते, असे ती म्हणाली.

मनोरंजन

सगळ्या ऍवॉर्ड फंक्‍शन्सना ती कुठले कपडे घालते, याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलेले असते. ती जे घालते त्याची स्टाईल होते. नवनवीन फॅशनची...

03.18 PM

"अनारकली ऑफ आरा' या चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेमुळे अभिनेत्री स्वरा भास्करवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. द्वयर्थी गाणे म्हणत...

03.18 PM

"काबील' चित्रपटात हृतिक रोशन "सुपर हिरो'ऐवजी एका सर्वसामान्य; पण दृष्टिहीन अशा रोहन भटनागरच्या भूमिकेत दिसला. रोहन भटनागर हे नाव...

03.09 PM