ब्रेकिंग न्यूज

नवी दिल्ली : एनएसयुआयच्या विद्यार्थ्यांचे दिल्ली विद्यापीठाच्या कला शाखेबाहेर उपोषण सुरु. #RamjasRow

परदेशात लोकप्रिय; भारतात नाही 

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

"माझे अनेक चित्रपट परदेशांमधील चित्रपट महोत्सवांमध्ये अत्यंत नावाजले गेले आहेत. भारतात मात्र सेन्सरशिपमुळे इथे मात्र त्यांना हवा तितका प्रतिसाद मिळत नाही,' असे नवाजुद्दीन सिद्दीकीचे म्हणणे आहे. विविध प्रकारच्या भूमिका अत्यंत ताकदीने वठवलेल्या नवाजुद्दीनने आपली ही खंत व्यक्त केली आहे. अनेक गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडून येत नाहीत. अनेक चांगले चित्रपट निर्माण होत आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांची प्रचंड स्तुती होते. त्यामुळे भारतातही हे चित्रपट चांगले चालतील, असे वाटते. मात्र, सेन्सॉरशिपमुळे आणि इतर काही कारणांमुळे भारतात हे चित्रपट चालत नाहीत.

"माझे अनेक चित्रपट परदेशांमधील चित्रपट महोत्सवांमध्ये अत्यंत नावाजले गेले आहेत. भारतात मात्र सेन्सरशिपमुळे इथे मात्र त्यांना हवा तितका प्रतिसाद मिळत नाही,' असे नवाजुद्दीन सिद्दीकीचे म्हणणे आहे. विविध प्रकारच्या भूमिका अत्यंत ताकदीने वठवलेल्या नवाजुद्दीनने आपली ही खंत व्यक्त केली आहे. अनेक गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडून येत नाहीत. अनेक चांगले चित्रपट निर्माण होत आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांची प्रचंड स्तुती होते. त्यामुळे भारतातही हे चित्रपट चांगले चालतील, असे वाटते. मात्र, सेन्सॉरशिपमुळे आणि इतर काही कारणांमुळे भारतात हे चित्रपट चालत नाहीत. हे फार भीतीदायक आहे, असे त्याचे म्हणणे आहे. नागरिकांना वास्तव पाहायला आवडते, मात्र आपल्याकडे त्यामध्येच बदल केला जातो, असे तो म्हणतो. नवाजुद्दीनचा "हरामखोर' 13 जानेवारीला प्रदर्शित होत असून, सुरवातीला या चित्रपटाला प्रसिद्धीची परवानगी देण्यास सेन्सॉर बोर्डाने नकार दिला होता. एक 14 वर्षांची मुलगी आणि तिच्या शिक्षकाचे नाते हा या चित्रपटाचा विषय आहे. 

मनोरंजन

ऍक्‍शनपटात आता हिरोच स्टंट करताना दिसतात. त्यासाठी मेहनत घेतात. विद्युत जामवालही स्वत:च स्टंटस्‌ करतो. अक्षयकुमारनंतर मार्शल आर्ट...

11.27 AM

"हॅप्पी भाग जायेगी'मधील डायना पेंटी हिने साकारलेल्या हरप्रीत कौरच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. आता "लखनौ सेंट्रल' या चित्रपटात...

11.21 AM

"अँड टीव्ही'वर 6 फेब्रुवारीपासून सुरू झालेली "एक विवाह ऐसा भी' ही मालिका तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसतेय. एक सून आणि दोन सासू हे...

11.15 AM