ब्रेकिंग न्यूज

इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडेमध्ये भारताच्या सहा बाद ३८१ धावा.

ट्रम्प यांची नक्कल पाहून हृदय विदीर्ण: स्ट्रीप

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

आपल्या देशाच्या सर्वांत मानाच्या स्थानी बसणाऱ्या व्यक्तीने एका अपंग पत्रकाराची नक्कल केलेली पाहून अतीव दु:ख झाले

बेव्हर्ली हिल्स (कॅलिफोर्निया) - गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामध्ये जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या मेरिल स्ट्रीप या ज्येष्ठ अभिनेत्रीने या व्यासपीठावरुन अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कठोर टीका केली. ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीमधील प्रचारमोहिमेदरम्यान एका अपंग पत्रकाराची नक्कल केलेली पाहून हृदय विदीर्ण झाल्याची भावना स्ट्रीप यांनी व्यक्त केली.

"या वर्षामधील त्या एका अभिनयाने मला थक्क केले. तो अभिनय माझ्या हृदयामध्ये खोलवर रुतला आहे. तो अभिनय चांगला अर्थातच नव्हता. मात्र आपल्या देशाच्या सर्वांत मानाच्या स्थानी बसणाऱ्या व्यक्तीने एका अपंग पत्रकाराची नक्कल केलेली पाहून अतीव दु:ख झाले. तो एखाद्या चित्रपटातील अभिनय नव्हता. ही प्रत्यक्ष आयुष्यातील घटना असल्याने मी विसरु शकत नाही,'' असे तीन वेळा ऑस्कर पारितोषिक जिंकलेल्या स्ट्रीप म्हणाल्या.

साऊथ कॅरोलिनामधील एका प्रचारमोहिमेदरम्यान ट्रम्प यांनी न्यूयॉर्क टाईम्सच्या सेर्गेई कोव्हालेस्की या पत्रकाराची नक्कल केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे. कोव्हालेस्की हे अपंग आहेत. मात्र ट्रम्प यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

मनोरंजन

बॉलीवूडचा दबंग खान ऊर्फ सलमान खानचे या वर्षी "ट्युबलाइट' व "टायगर जिंदा है' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यानंतर...

10.15 AM

बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक चित्रपटाची सिनेरसिक आवर्जून वाट पाहत असतात. नुकतेच आपण त्यांना "पिंक'मध्ये पाहिले...

10.06 AM

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी 'खुल्लम खुल्ला' या आत्मचरित्रातून आपले आयुष्य...

बुधवार, 18 जानेवारी 2017