अश्‍शा आहेत पाठकबाई !!! 

संकलन :भक्ती परब 
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील सर्वांच्या लाडक्‍या पाठकबाई म्हणजेच अंजली अवघ्या महाराष्ट्राची लेक झाली आहे. घराघरात सध्या तिचीच चर्चा आहे. तिचं खरं नाव आहे अक्षया देवधर. ती मुळची पुण्याची. पण आता तिचे महाराष्ट्रात असंख्य चाहते आहेत. अक्षया पुण्यातील नाटक कंपनी या संस्थेशी जोडलेली आहे. तिने त्यांच्याबरोबर खास करून अभिनेता अमेय वाघसोबत नाटकात काम केलं आहे. बिनकामाचे संवाद, आयटम, दर्शन, संगीत मानापमान अशा काही नाटकांमध्ये तिने काम केलंय. पण अक्षयाची "तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनेच खरी ओळख निर्माण झाली. अक्षयाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील सर्वांच्या लाडक्‍या पाठकबाई म्हणजेच अंजली अवघ्या महाराष्ट्राची लेक झाली आहे. घराघरात सध्या तिचीच चर्चा आहे. तिचं खरं नाव आहे अक्षया देवधर. ती मुळची पुण्याची. पण आता तिचे महाराष्ट्रात असंख्य चाहते आहेत. अक्षया पुण्यातील नाटक कंपनी या संस्थेशी जोडलेली आहे. तिने त्यांच्याबरोबर खास करून अभिनेता अमेय वाघसोबत नाटकात काम केलं आहे. बिनकामाचे संवाद, आयटम, दर्शन, संगीत मानापमान अशा काही नाटकांमध्ये तिने काम केलंय. पण अक्षयाची "तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनेच खरी ओळख निर्माण झाली. अक्षयाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिच्या आई-वडिलांनीही तिला याबाबत पूर्ण पाठिंबा दिला. 

अक्षया अहिल्यादेवी माध्यमिक हायस्कूल शाळेची विद्यार्थिनी. तिने बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतरच ती अभिनयासाठी पुण्याहून मुंबईला आली. अक्षया मालिकेत अंजली पाठक नावाच्या खेडेगावातील शिक्षिकेची भूमिका करतेय आणि ती राणा नावाच्या पहिलवानाच्या प्रेमात पडते, असं या मालिकेचं कथानक. आता सध्या मालिकेत राणा आणि अंजलीच्या लग्नानंतरचं सहजीवन दाखवलं जातंय. त्या दोघांमधील अलवार प्रेम, त्यांचा लाजरा स्वभाव, दोघांच्या बोलण्याची पद्धत सारं काही प्रेक्षकांना भावतं आहे. नुकताच या मालिकेने 150 भागांचा टप्पा पार केलाय. या मालिकेत राणा, अंजलीसोबत नंदिता वहिनी, बरकत, गोदाक्का आणि साहेबराव या साऱ्या पात्रांनी मराठी प्रेक्षकांना वेड लावलंय. कोल्हापूरच्या पार्श्‍वभूमीवर, गावाकडच्या लाल मातीत रंकाळ्याच्या परिसरात फुललेली राणा अंजलीची प्रेमकहाणी कुणालाही आपलीशी वाटेल अशीच आहे. यापुढेही अक्षयाला चाहत्यांचं प्रेम असंच मिळत राहो... 

मनोरंजन

आनंदी असलो की आपल्याला नाचावंसं वाटतं आणि नाचताना आनंद मिळतो. हा नृत्य सोहळा अनुभवण्यासाठी 29 एप्रिलला आंतराष्ट्रीय नृत्य-दिन...

शनिवार, 29 एप्रिल 2017

पुण्यामध्ये येत्या सोमवारी (ता.१ मे) ‘ऋषी कपूर लाइव्ह’ हा शो गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमात ऋषी कपूर यांची...

शनिवार, 29 एप्रिल 2017

सामान्य चित्रपटरसिकांपासून ते समीक्षक, कलाकार, सेलिब्रिटी अशा सर्व स्तरांतून 'बाहुबली 2' चित्रपटावर स्तुतिसुमने उधळण्यात येत आहेत...

शुक्रवार, 28 एप्रिल 2017