गोल्डन ग्लोबवर "ला ला लॅंड'ची छाप..!

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिका केलेल्या एमा स्टोन व रायन गोसलिंग या अभिनेत्यांनीही गोल्डन ग्लोबवर नाव कोरण्यात यश मिळविले. याचबरोबर, "टीव्ही' प्रकारांत ब्रिटीश अभिनेत्यांनी वरच्ष्मा कायम राखला

बेव्हर्ली हिल्स (कॅलिफोर्निया) - "ला ला लॅंड' या बहुचर्चित चित्रपटाने तब्बल सात "गोल्डन ग्लोब' पुरस्कार मिळवित नवा विक्रम रचला आहे. किंबहुना "दिग्दर्शन, पटकथा, संगीत' अशा ज्या ज्या क्षेत्रांत या चित्रपटास नामांकन मिळाले, त्या सर्व क्षेत्रांमध्ये या चित्रपटाने बाजी मारली.

या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिका केलेल्या एमा स्टोन व रायन गोसलिंग या अभिनेत्यांनीही गोल्डन ग्लोबवर नाव कोरण्यात यश मिळविले. ला ला लॅंडशिवाय "मूनलाईट' या चित्रपटानेही "बेस्ट ड्रामा पुरस्कार' मिळविण्यात यश मिळविले.

याचबरोबर, "टीव्ही' प्रकारांत ब्रिटीश अभिनेत्यांनी वरच्ष्मा कायम राखला. दी नाईट मॅनेजर आणि दी क्राऊन या मालिकांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांनाही गोल्डन ग्लोबने गौरविण्यात आले. "हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन'तर्फे गोल्डन ग्लोब पुरस्कार घोषित केले जातात.

मनोरंजन

सगळ्या ऍवॉर्ड फंक्‍शन्सना ती कुठले कपडे घालते, याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलेले असते. ती जे घालते त्याची स्टाईल होते. नवनवीन फॅशनची...

03.18 PM

"अनारकली ऑफ आरा' या चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेमुळे अभिनेत्री स्वरा भास्करवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. द्वयर्थी गाणे म्हणत...

03.18 PM

"काबील' चित्रपटात हृतिक रोशन "सुपर हिरो'ऐवजी एका सर्वसामान्य; पण दृष्टिहीन अशा रोहन भटनागरच्या भूमिकेत दिसला. रोहन भटनागर हे नाव...

03.09 PM