ब्रेकिंग न्यूज

गोंदिया (महाराष्ट्र) : गोंदिया येथील प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमान चालकांच्या विमानाचा बालाघाट येथे अपघात. दोन विमानचालकांचा मृत्यू.
नवी दिल्ली : पराभवाची जबाबदारी स्वीकारून दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी दिला पदाचा राजीनामा.
दिल्लीतील तीनही महापालिकांमधील मिळून एकूण २७२ जागांपैकी भाजपच्या खात्यात १७७ जागा
पराभवानंतर 'आप'ने 'ईव्हीएम'वर फोडले खापर
दिल्लीमधील महापालिका निवडणुकीत भाजपची दणदणीत बहुमताकडे वाटचाल

कपिल शर्माने दिली प्रेमाची कबुली; शुभेच्छांचा वर्षाव

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मार्च 2017

आपल्या कॉमेडी शोमध्ये दीपिका पदुकोन आणि इतर अभिनेत्रींशी गोडीगुलाबीत बोलत प्रेमाचा आभास निर्माण करणाऱ्या कपिलने त्याच्या खऱ्या प्रेमाची कबुली अखेर दिली आहे.

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने त्याचे प्रेम जाहीर करीत प्रेयसी जिनी छतरथ हिच्यासोबतचा फोटो शेअर केल्यानंतर त्याच्यावर अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

'ती माझी बेटर हाफ (अर्धांगिनी) आहे असे मी म्हणणार नाही.. तिच्यामुळे मी पूर्ण होतो.. लव्ह यू जिनी..' असे कपिल शर्माने ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्विटमध्ये त्याने तिच्यासोबतचा फोटोही शेअर केला आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीही न बोलणाऱ्या कपिलने त्याच्या चाहत्यांना हे जाहीर करून 'सरप्राइज' दिले. 

जालंधरमध्ये कॉलेजला असताना कपिल आणि जिनी यांची ओळख झाली. गेल्या दहा वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. कपिल हा तिच्या कॉलेजमध्ये एकपात्री विनोदी कार्यक्रम करायला जात असे. "तेव्हा मी तिच्या प्रेमात पडला. माझी आईसुद्धा तिच्या प्रेमात पडली तेव्हा मी हे अधिकृत करायचं ठरवलं," असे कपिलने एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना सांगितले. 

आपल्या कॉमेडी शोमध्ये दीपिका पदुकोन आणि इतर अभिनेत्रींशी गोडीगुलाबीत बोलत प्रेमाचा आभास निर्माण करणाऱ्या कपिलने त्याच्या खऱ्या प्रेमाची कबुली अखेर दिली आहे. मला जे हवं ते सर्व जिनीमध्ये आहे, असं कपिल म्हणतो. पुढील वर्षी (2018) जानेवारीत विवाहबद्ध होण्याचा विचार असल्याचेही कपिलने सांगितलं आहे. 

कलर्स वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राज नायक, कपिलची कथित गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत आलेली प्रीती सिमोज यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी कपिलला शुभेच्छा दिल्या. 'आनंदी जीवन जगा' असे प्रीतीने म्हटले आहे, तर जुही चावलानेही कपिलचे अभिनंदन केले आहे. 
 

मनोरंजन

हॉलीवूड रॉकस्टार जस्टिन बिबरची कॉन्सर्ट भारतात होतेय अन्‌ त्यात आपली "दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा गाणार आहे हे समजल्यावर...

12.51 PM

अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या आगामी तमीळ चित्रपट "विवेगम'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सर्बियात हे चित्रीकरण सुरू असून कमी तापमानातही...

08.57 AM

हे ऐकून तुम्हाला आश्‍चर्याचा धक्का बसला असेल ना...तुम्हाला हा शुद्ध वेडेपणा वाटला असेल ना... 324 वर्षांचा माणूस असतो तरी काय? पण...

08.57 AM