बिपाशा आणि करणचा पाण्यातील रोमान्स 

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत, याची जाणीव ते वेळोवेळी सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देतच असतात. बिपाशा आणि करण आता गेलेत ऑस्ट्रेलियामध्ये. त्यांचा गेल्या सहा महिन्यातला प्रवास बघितला, तर त्यांच्या आयुष्यातील ही एक मोठ्ठी सुट्टी वाटेल. गेल्या सहा महिन्यात ते बाली, स्पेन, मालदिवला जाऊन आलेत आणि आता ऑस्ट्रेलिया. सगळ्यांबरोबर ख्रिसमस सेलिब्रेट केल्यानंतर हे जोडपं बॅगा भरून ऑस्ट्रेलियाला निघालं.

न्यू इयर आणि त्यानंतर बिपाशाच्या बर्थ डेसाठी त्यांनी आपली ही व्हेकेशन लांबवली. दोघं ऑस्ट्रेलियात बिचेस, गोल्ड कोस्ट, सिडनी अशी ठिकाणं फिरताहेत. दोघांनाही भटकंती करायला भयंकर आवडतं म्हणे. आता दोघं स्नॉर्रक्‍लिंगही करण्याचा अनुभव घेणार आहेत. बिपाशा म्हणाली,""आम्ही इथली सगळी बेटं पालथी घालणार आहोत. आम्हा दोघांनाही पाणी प्रचंड आवडत असल्याने आम्ही स्नॉर्रक्‍लिंगही करून बघणार आहोत. हा खूप वेगळा अनुभव असेल. आम्ही वॉटसन बे, ब्लू माऊंटन्स आणि समुद्रकिनारी खूप चांगला वेळ घालवला आहे.'' 
 
मनोरंजन

बॉलीवूडचा दबंग खान ऊर्फ सलमान खानचे या वर्षी "ट्युबलाइट' व "टायगर जिंदा है' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यानंतर...

10.15 AM

बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक चित्रपटाची सिनेरसिक आवर्जून वाट पाहत असतात. नुकतेच आपण त्यांना "पिंक'मध्ये पाहिले...

10.06 AM

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी 'खुल्लम खुल्ला' या आत्मचरित्रातून आपले आयुष्य...

बुधवार, 18 जानेवारी 2017