महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम 21 फेब्रुवारीला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

मुंबई- राज्यातील दहा महानगरपालिकांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे, आचारसंहिता आजपासून लागू होत आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया आज (बुधवार) दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई- राज्यातील दहा महानगरपालिकांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे, आचारसंहिता आजपासून लागू होत आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया आज (बुधवार) दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती व सोलापूर या दहा महानगरपालिकसांठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. राज्यातील 10 महानगर पालिका, 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहे. जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, पहिला टप्प्यात 15 जिल्हे व 165 पंचायत समिती असणार आहेत. दुसरा टप्प्यात 11 जिल्हे 118 पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. 16 फेब्रुवारी रोजी 15 जिल्ह्यातील जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार तर 21 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे, असे सहारिया यांनी सांगितले.

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांची पत्रकारर परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

  • 4 मार्च ते 3 एप्रिल काळामध्ये दहा महानगरपालिकांची मुदत संपत आहे.
  • मार्च-एप्रिलमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा, वेळापत्रक ठरवताना निवडणूकांचा विचार केला.
  • दहा महानगरपालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणूक होणार.
  • 283 पंचायत समितींच्या निवडणूक होणार.
  • 10 महानगर पालिका, 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समितीच्या निवडणूका होणार.
  • जिल्हा परिषदांसाठी 2 टप्यात मतदान, 15 जिल्हे.
  • केंद्रीय निवडणूक आयोगाने 5 जानेवारीला मतदार यादी जारी केली, त्यानुसार निवडणुका घेतल्या जातील.
  • नागपूर सोडून 25 जिल्हा परिषदांसाठी तारखा जाहीर होणार
  • 26 जिल्हा परिषद मुदत 21 मार्च, पंचायत समिती मुदत 13 मार्च,10 महापालिका मुदत 4 मार्च ते 3 एप्रिलला संपेल
  • 16 फेब्रुवारीला 15 जिल्ह्यातील जिल्हा परिषदांसाठी मतदान, 21 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदांसाठी मतदान
  • जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान 21 फेब्रुवारीला
  • 165 पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान 16 फेब्रुवारीला.
  • आचारसंहिता आजपासून लागू
  • महापालिकेसाठी 19 फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता प्रचारबंदी

महाराष्ट्र

मुंबई - त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांवर केलेल्या कारवाईनंतर आता आयकर विभागाची करडी नजर राज्यभरतील सराफांकडे वळाली आहे. बॅंकेत...

09.06 AM

मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आज कॉंग्रेसने आरबीआयच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी...

05.03 AM

सातारा - राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता शांत राहिलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी वेगळ्या...

03.33 AM