...तर मासेमारी केली असती - नदाल

पीटीआय
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सिडनी - प्रमुख प्रतिस्पर्ध्यांना हरवून विजेतेपद जिंकण्याचा विश्वास वाटत नसता, तर मी घरी बसलो असतो आणि मासेमारी केली असती, असे उद्‌गार स्पेनचा जिगरबाज टेनिसपटू रॅफेल नदाल याने काढले. दुखापतींनी घेरले असले तरी खेळावरील निष्ठा कमी झाली नसल्याचे निर्धार त्याने व्यक्त केला.

सिडनी - प्रमुख प्रतिस्पर्ध्यांना हरवून विजेतेपद जिंकण्याचा विश्वास वाटत नसता, तर मी घरी बसलो असतो आणि मासेमारी केली असती, असे उद्‌गार स्पेनचा जिगरबाज टेनिसपटू रॅफेल नदाल याने काढले. दुखापतींनी घेरले असले तरी खेळावरील निष्ठा कमी झाली नसल्याचे निर्धार त्याने व्यक्त केला.

नदालने कारकिर्दीत १४ ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविली आहेत. २०१४ मधील फ्रेंच विजेतेपदानंतर त्याला ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत भरीव यश मिळविता आलेले नाही. मागील मोसमात त्याला मनगटाच्या दुखापतीने त्रस्त केले. अनेकांच्या मते त्याच्या कारकिर्दीचा बहर संपला आहे. नदाल ऑस्ट्रेलियन ओपनच्या पूर्वतयारीसाठी सक्रिय आहे. त्याने सांगितले, की महत्त्वाच्या स्पर्धांत चुरशीने खेळणे हे माझे खरे ध्येय आहे. मी कसून सराव करीत असेन आणि खेळण्याची प्रेरणा आणि निष्ठा असेल, मला खेळण्याचा आनंद वाटत असेल तर मी जिंकू शकतो.

नदालसाठी ऑस्ट्रेलियन ओपन फारसे फलदायी ठरलेले नाही. कारकिर्दीत तो एकदाच ही स्पर्धा जिंकू शकला. २००९ मध्ये तो विजेता ठरला. गेल्या वर्षी तो पहिल्याच फेरीत स्पेनच्या फर्नांडो व्हरडॅस्को याच्याकडून हरला. त्याने सांगितले की, मला मेलबर्नमध्ये खेळायला आवडते. ही एक अप्रतिम स्पर्धा आहे. येथे पुन्हा खेळण्यास मी आतुर आहे. चांगला आणि चुरशीने खेळ करू लागलो तर काहीही घडू शकेल. मागील वर्ष खडतर ठरले. या वर्षी बदल करण्याची आणि पुन्हा सरस खेळण्याची मला आशा आहे.

क्रीडा

तिसऱ्या दिवशीच्या खेळावर आपल्या अष्टपैलू कामगिरीची मोहोर उमटवणाऱ्या रवींद्र जडेजाने बकबक करणाऱ्या मॅथ्यू वेडला चिडवताना सुनावले...

07.18 PM

धरमशाला - भारतीय वेगवान गोलंदाजांनी रचलेल्या प्रभावी आक्रमणास फिरकी गोलदाजांचीही आश्‍वासक साथ मिळाल्याने धरमशाला येथील कसोटी...

04.27 PM

धरमशाला : यंदाच्या मोसमात भन्नाट सूर गवसलेल्या रवींद्र जडेजामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या...

11.54 AM