बॅडमिंटन क्रमवारीत सिंधू तिसरी

पीटीआय
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मुंबई - बी. साईप्रणीतने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत २२ वा क्रमांक मिळवत आतापर्यंतचे सर्वोत्तम मानांकन मिळवले आहे. पी. व्ही. सिंधूने दोन क्रमांकांनी प्रगती करीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.

मुंबई - बी. साईप्रणीतने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत २२ वा क्रमांक मिळवत आतापर्यंतचे सर्वोत्तम मानांकन मिळवले आहे. पी. व्ही. सिंधूने दोन क्रमांकांनी प्रगती करीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या दृष्टीने मानांकन क्रमवारी जास्त महत्त्वाची आहे. अव्वल २४ मध्ये स्थान असल्यास जागतिक स्पर्धेच्या पात्रतेचे दरवाजे उघडतात. त्यामुळे या क्रमवारीस महत्त्व आहे. अर्थात, पुढील आठवड्यातील क्रमवारीनुसार हा निर्णय होईल. साईप्रणीतने आठ क्रमांकांनी प्रगती केली आहे. सिंगापूर ओपन स्पर्धेतील विजेतेपदामुळेच तो हे साध्य करू शकला. मात्र, या स्पर्धेतील उपविजेत्या किदांबी श्रीकांतने अजूनही  साईप्रणीतला मागे टाकले असून, तो २१ वा आहे. पुरुष एकेरीत सौरभ वर्मा ४० व्या स्थानावर आहे. महिला एकेरीत सिंधूने दोन क्रमांकांनी प्रगती केली आहे. या क्रमवारीत चीनची ताई झु यिंग पहिल्या, तर कॅरोलीन मरिन दुसऱ्या क्रमांकावर आहे. साईना नेहवालने एका क्रमांकाने प्रगती करीत आठवा क्रमांक मिळवला. साईना, सिंधू सोडल्यास एकही भारतीय महिला अव्वल ४० मध्ये नाही. सहा क्रमांकांनी प्रगती केलेली रितूपर्णा दास ४६ वी; तर तन्वी लाड ५३ वी आहे.

क्रीडा

पुणे - नॅशनल कॅपिटल रिजन (दिल्ली) संघाचा सुमीत पन्नासावा "हिंदकेसरी' ठरला. मातीमधील भारताचा या वर्षीचा सर्वोत्तम मल्ल असलेल्या...

12.21 AM

मोहाली - संदीप शर्माची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर मार्टिन गुप्टिलच्या फटकेबाजीने आयपीएलमध्ये रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने...

रविवार, 30 एप्रिल 2017

इपोह (मलेशिया) - भारताने सुलतान अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत पहिला विजय मिळवीत न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला. भारताला पहिल्या...

रविवार, 30 एप्रिल 2017