ब्रेकिंग न्यूज

गोंदिया (महाराष्ट्र) : गोंदिया येथील प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमान चालकांच्या विमानाचा बालाघाट येथे अपघात. दोन विमानचालकांचा मृत्यू.
नवी दिल्ली : पराभवाची जबाबदारी स्वीकारून दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी दिला पदाचा राजीनामा.
दिल्लीतील तीनही महापालिकांमधील मिळून एकूण २७२ जागांपैकी भाजपच्या खात्यात १७७ जागा
पराभवानंतर 'आप'ने 'ईव्हीएम'वर फोडले खापर
दिल्लीमधील महापालिका निवडणुकीत भाजपची दणदणीत बहुमताकडे वाटचाल

'कलमाडी, चौटालांच्या निवडीचा निर्णय झालाच नव्हता'

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची नियुक्ती भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अंगलट आली होती. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावताना या जोडगोळीला हटवत नाही तोपर्यंत सर्व संबंध तोडून टाकण्याचा इशारा दिला.

नवी दिल्ली - भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) चेन्नईत झालेल्या वार्षिक बैठकीत सुरेश कलमाडी व अभयसिंह चौटाला यांची अनुक्रमे तहहयात आश्रयदाते आणि अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचा निर्णय झालाच नसल्याचे, आयओएचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी सांगितले.

सुरेश कलमाडी यांच्यावर 2010 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्या वेळी कलमाडी भारतीय ऑलिंपिक संघटना आणि राष्ट्रकुल संयोजन समितीचे अध्यक्ष होते. याच भ्रष्टाचार प्रकरणात कलमाडी यांना 2014 मध्ये अटकदेखील करण्यात आली होती. यानंतरही 2015 मध्ये त्यांना ऍथलेटिक्‍समध्ये दिलेल्या योगदानाबद्दल आशियाई ऍथलेटिक्‍स संघटनेच्या अध्यक्षीय पदकाने गौरविण्यात आले होते. त्याचबरोबर अभयसिंह चौटाला यांच्या अध्यक्षाच्या निवडीस आक्षेप घेत भारतीय ऑलिंपिक संघटनेस निलंबित करण्यात आले होते. मात्र, घटनाबदल झाल्यावर त्यांना पदावरून दूर करण्यात आले होते. 

सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची नियुक्ती भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अंगलट आली होती. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावताना या जोडगोळीला हटवत नाही तोपर्यंत सर्व संबंध तोडून टाकण्याचा इशारा दिला. कलमाडी व चौटाला यांनी ही वेळ योग्य नसल्याचे कारण देत हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता. आता रामचंद्रन यांनीही चेन्नईतील बैठकीत असा काही प्रस्ताव मंजूर झाला नसल्याचे म्हटले आहे.

क्रीडा

नवी दिल्ली - आयसीसीच्या उत्पन्नातील वाट्यावरून बीसीसीआय (भारतीय क्रिकेट मंडळ) आणि आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) यांच्यात...

05.09 AM

ब्युनॉस आयर्स - अर्जेंटिनाच्या संघाकडे अनपेक्षित कामगिरी करण्याची क्षमता नेहमीच राहिली आहे. आगामी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी...

03.24 AM

न्यूयॉर्क - रुमानियाचे माजी टेनिसपटू ईली नस्तासे यांनी वर्णभेदी वक्तव्य केल्याबद्दल सेरेना विल्यम्सने टीका केली. "सेरनाचे...

02.39 AM