ब्रेकिंग न्यूज

गोंदिया (महाराष्ट्र) : गोंदिया येथील प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमान चालकांच्या विमानाचा बालाघाट येथे अपघात. दोन विमानचालकांचा मृत्यू.
नवी दिल्ली : पराभवाची जबाबदारी स्वीकारून दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी दिला पदाचा राजीनामा.
दिल्लीतील तीनही महापालिकांमधील मिळून एकूण २७२ जागांपैकी भाजपच्या खात्यात १७७ जागा
पराभवानंतर 'आप'ने 'ईव्हीएम'वर फोडले खापर
दिल्लीमधील महापालिका निवडणुकीत भाजपची दणदणीत बहुमताकडे वाटचाल

शास्त्रीबुवांच्या ‘दादा’ कर्णधारांच्या यादीत गांगुलीच नाही...

पीटीआय
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नवी दिल्ली - प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीला परीक्षक म्हणून उपस्थित न राहता नापास केलेल्या दादा अर्थात सौरभ गांगुली यास रवी शास्त्री यांनी सर्वोत्तम भारतीय कर्णधारांच्या यादीत स्थानच दिले नाही. दादा कर्णधार म्हणून त्यांनी महेंद्रसिंह धोनीला पसंती दिली.

शास्त्री यांनी एका मासिकाला मुलाखत दिली. गांगुलीचा समावेश असलेल्या समितीने कुंबळेची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्याआधी संघ संचालक शास्त्री होते. प्रशिक्षकपदासाठीही त्यांनी अर्ज केला होता. थायलंडमधून स्काइपवर त्यांनी प्रेझेंटेशन केले.

नवी दिल्ली - प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीला परीक्षक म्हणून उपस्थित न राहता नापास केलेल्या दादा अर्थात सौरभ गांगुली यास रवी शास्त्री यांनी सर्वोत्तम भारतीय कर्णधारांच्या यादीत स्थानच दिले नाही. दादा कर्णधार म्हणून त्यांनी महेंद्रसिंह धोनीला पसंती दिली.

शास्त्री यांनी एका मासिकाला मुलाखत दिली. गांगुलीचा समावेश असलेल्या समितीने कुंबळेची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्याआधी संघ संचालक शास्त्री होते. प्रशिक्षकपदासाठीही त्यांनी अर्ज केला होता. थायलंडमधून स्काइपवर त्यांनी प्रेझेंटेशन केले.

आपल्या मुलाखतीला गांगुली उपस्थित नव्हता. पदाच्या जबाबदारीला त्याने न्याय दिला नाही, असा आरोप शास्त्री यांनी केला होता. त्यानंतर गांगुलीने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. प्रशिक्षकासारख्या महत्त्वाच्या पदासाठी मुलाखतीकरिता शास्त्रीने प्रत्यक्ष उपस्थित राहायला हवे होते. सुटीवर असताना प्रेझेंटेशन करण्याने त्यांचा दृष्टिकोन ‘सिरियस’ नसल्याचे स्पष्ट होते, अशा आशयाचा टोला गांगुलीने लगावला होता. माझ्यामुळे निवड झाली नाही, असे शास्त्री यांना वाटत असेल तर ते मूर्खाच्या दुनियेत वावरत आहेत, अशी जळजळीत प्रतिक्रियाही गांगुलीने व्यक्त केली होती.

या पार्श्‍वभूमीवर शास्त्री यांचे वक्तव्य धक्का देणारे नाही. त्यांनी यशस्वी कर्णधारांमध्ये कपिल देव, अजित वाडेकर आणि मन्सूर अली खान पतौडी यांची नावे घेतली.

दादा कर्णधाराला माझा सलाम, अशी सुरवात करून धोनीविषयी ते म्हणाले, की उपलब्ध असलेली प्रत्येक गोष्ट धोनीने जिंकली आहे. त्याला सिद्ध करून दाखविण्यासारखे काहीही उरलेले नाही. त्यामुळे सर्वाधिक भारतीय कर्णधार म्हणून तो कितीतरी पटींनी पुढे आहे. या बाबतीत कुणीही त्याच्या आसपास सुद्धा नाही. 

ते पुढे म्हणाले की, या यादीत नंतर कपिल आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण विश्वकरंडक जिंकला आणि त्याच्यामुळेच इंग्लंडमध्ये १९८६ मध्ये मालिका जिंकली. वन-डे क्रिकेटच्या आधीच्या युगात अजित वाडेकर गाजले. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमध्ये सलग जिंकलो. याशिवाय अर्थातच टायगर पतौडी यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांचा करिष्मा वेगळाच होता.

क्रीडा

नवी दिल्ली - आयसीसीच्या उत्पन्नातील वाट्यावरून बीसीसीआय (भारतीय क्रिकेट मंडळ) आणि आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) यांच्यात...

05.09 AM

ब्युनॉस आयर्स - अर्जेंटिनाच्या संघाकडे अनपेक्षित कामगिरी करण्याची क्षमता नेहमीच राहिली आहे. आगामी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी...

03.24 AM

न्यूयॉर्क - रुमानियाचे माजी टेनिसपटू ईली नस्तासे यांनी वर्णभेदी वक्तव्य केल्याबद्दल सेरेना विल्यम्सने टीका केली. "सेरनाचे...

02.39 AM