भारत दौरा ठरेल आव्हानात्मक- स्टिव्ह स्मिथ 

वृत्तसंस्था
रविवार, 8 जानेवारी 2017

सिडनी : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारतातील आगामी कसोटी दौरा म्हणजे पूर्णपणे वेगळ्या पातळीवरचे आव्हान घेऊन येणारा असेल, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने त्याच्या सहकाऱ्यांना दिला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्यानंतर कांगारूंनी पाकिस्तानला कसोटी मालिकेत 3-0 असा व्हाईट वॉश दिला. ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. 

ऑस्ट्रेलियाने 2004 नंतर भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. यादरम्यानच्या सातही मॅचेसमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारत दौरा केला होता. त्यावेळी त्यांना चारही सामन्यांमध्ये पराभव करीत भारताने 'व्हाईट वॉश' दिला होता. त्यामुळे आगामी भारत दौरा आव्हानात्मक आहे असे कर्णधार स्मिथने म्हटले आहे. 

स्मिथ म्हणाला, "भारताविरुद्धची मालिका ही खूप अवघड असेल. आम्ही कोणत्याही भ्रमात नाही. भारत दौऱ्यामध्ये संघातील खेळाडूंना खूप काही शिकायला मिळेल."
 
क्रीडा

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाला आक्रमकतेचे धडे देणारे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या सन्मानार्थ ऐतिहासिक ईडन गार्डन्स...

03.03 PM

कटक : "कॅन्सरशी झगडून मी पुन्हा मैदानात पाऊल टाकले; पण संघासाठी माझी कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नव्हती. यामुळे मी संघातून...

11.33 AM

नवी दिल्ली : ड्रॅगफ्लिकर रूपिंदरपाल सिंग याची आगामी हॉकी लीगसाठी दिल्ली वेव्हरायडर्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात...

10.18 AM