रानमेवा रुसल्याने आदिवासी चिंतीत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

रसायनी - निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा जांभळे, करवंदे, काजू या रानमेव्याला बसला आहे. रसायनी परिसरात हा रानमेवा कमी प्रमाणात पिकल्याने शेतकरी व वाड्यांतील आदिवासी हिरमुसले आहेत. मोहोपाडा बाजारपेठेत आगदी तुरळक रानमेवा विक्रीसाठी येऊ लागला आहे. 

रसायनी - निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा जांभळे, करवंदे, काजू या रानमेव्याला बसला आहे. रसायनी परिसरात हा रानमेवा कमी प्रमाणात पिकल्याने शेतकरी व वाड्यांतील आदिवासी हिरमुसले आहेत. मोहोपाडा बाजारपेठेत आगदी तुरळक रानमेवा विक्रीसाठी येऊ लागला आहे. 

रसायनीलगतचा कर्नाळा किल्ला आणि पाताळगंगातील घेरामणिक गडाच्या डोंगररांगात अनेक आदिवासी वाड्या आहेत. यातील अनेक आदिवासींना उपजीविकेचे ठोस साधन नाही. हे आदिवासी तसेच खेड्यातील काही शेतकरी उन्हाळ्यात जांभळं, करवंदं, आंबे, काजू आदी जंगलातील रानमेवा विकून घरखर्चाला हातभार लावतात. यंदा रानमेवा रुसल्याने उन्हाळ्यातल्या या उत्पन्नाला मुकावे लागते की काय, ही चिंता त्यांना सतावते आहे. 

मागील वर्षी पाऊस चांगला झाला. त्यानंतर थंडीही चांगली पडली. फळबागांसाठी अनुकूल वातावरण होते; मात्र मध्येच थंडीत धुके पडू लागले. अगदी सुरुवातीला मोहोर येण्याच्या काळात खराब हवामानाचा झाडांवर परिणाम झाला. त्यामुळे कमी मोहोर आला, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

रानमेव्याचे दर 
 जांभूळ : ८० रुपये किलो. 
 करवंदाचा वाटा दहा रुपयात.

कोकण

पाली : पशू- प्राणी यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी ग्रामीण भागामध्ये प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत; पर्यायाने त्यांच्या जीवितास...

शनिवार, 29 एप्रिल 2017

चिपळूण : आंब्याची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक विक्रेत्यांनी आंबा पिकण्यासाठी कार्बाईडचा मारा सुरू केल्याचे बोलले जात आहे. अशा...

शनिवार, 29 एप्रिल 2017

सावंतवाडी : कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता मी शिवसेनेत आलो आहे. भविष्यात संघटना वाढवायची आहे. यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेन...

शनिवार, 29 एप्रिल 2017