भविष्य

मेष:
जिद्द व चिकाटी वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रवास सुखकर होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.
वृषभ:
आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. महत्वाची आर्थिक कामे पूर्ण होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग येतील. महत्वाची बातमी समजेल.
मिथुन:
उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल. दिवस आपणाला अनुकूल आहे. मानसिक अस्वस्थता कमी होईल. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवासास दिवस अनुकूल आहे.
कर्क:
आर्थिक कामे नकोत. मनोबल कमी राहील. वादविवाद टाळावेत. दिवस फारसा अनुकूल नाही. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.
सिंह:
आर्थिक लाभ होतील. संततीसौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. महत्वाचे निर्णय घेवू शकाल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील.
कन्या:
व्यवसायात वाढ करू शकाल. नोकरीमध्ये उत्तम स्थिती राहील. महत्वाची कामे मार्गी लावू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आनंदी व आशावादी रहाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
तूळ:
एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
वृश्चिक:
मनोबल कमी राहील. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. महत्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत.
धनु:
आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल. आर्थिक लाभ होतील.
मकर:
शत्रूपिडा फारशी जाणवणार नाही. खर्च वाढणार आहेत. काहींना आर्थिक नुकसान होण्याची शक्‍यता आहे. वाहने सावकाश चालवावीत. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल.
कुंभ:
संततीसौख्य लाभेल. महत्वाचे निर्णय घेवू शकाल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्वाची कामे नकोत.
मीन:
प्रवास सुखकर होतील. मन आनंदी व आशावादी राहील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. जागेचे व्यवहार यशस्वी होतील. दैनंदिन कामे यशस्वी होतील. व्यवसाय वाढेल.
रविवार, एप्रिल 30, 2017 ते शनिवार, मे 6, 2017
मेष:
जनसंपर्क फलदायी ठरेल हा सप्ताह अतिशय गतिमान राहील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह मुलाखती, गाठी-भेटी व इतर जनसंपर्क माध्यमांतून मोठे चमत्कार घडवणारा. मंगळवार सर्व प्रकारे शुभ. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारची संध्याकाळ मातृचिंताजनक.
वृषभ:
मोठा धनलाभ होईल मंगळाची नक्षत्रगतस्थिती शुभग्रहांच्या पार्श्‍वभूमीवर अप्रतिम फळं देईल. मोठा धनलाभ होईल. पती वा पत्नीविषयक एखादा भाग्योदय. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार मोठ्या मौजमजेचा. शनिवारची संध्याकाळ कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी वेदनामय.
मिथुन:
वरिष्ठांची मर्जी राहील सतत ग्रीन सिग्नल मिळत राहील! हसत राहाल; अर्थात वेडे होऊन नव्हे! आजचा रविवार मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विशेष शुभदायक. विवाहविषयक महत्त्वाच्या गाठी-भेटी होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट नोकरीत शुभ. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मात्र, वाहनं सांभाळा. संध्याकाळी प्रवास टाळा.
कर्क:
वास्तूचे व्यवहार होतील सप्ताह कष्टाचा आणि खर्चाचा. ता. तीन व चार मे हे दिवस दिनक्रम विस्कटवतील. नोकरीत ताण. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना कामगारपीडा. बाकी पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना दोन मे रोजी प्रिय व्यक्तींच्या सुवार्ता कळतील. वास्तूविषयक व्यवहार होतील. तरुणांचं परदेशगमन. शनिवारची संध्याकाळ कलहजन्य.
सिंह:
अन्न-पाण्याच्या संसर्गापासून जपा सप्ताहातली ग्रहरचना अपवादात्मक लाभ देईल. मात्र, अन्न-पाण्याच्या संसर्गापासून जपा. बाकी, मघा नक्षत्राच्या व्यक्तींना चार ते सहा हे दिवस अनेक शुभ घटनांद्वारे सद्गदित करणारे. संततीविषयक भाग्योदय. मात्र, शनिवारी संध्याकाळी खरेदीत सावधान. चोरीपासून जपा.
कन्या:
सरकारी कामं मार्गी लागतील सप्ताहात अन्न-पाण्यातल्या संसर्गापासून जपा. हाताची बोटं जपा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार शुभ लक्षणांचा. व्यावसायिक सरकारी कामं होतील. एखादा भूखंड सोडवाल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात व्हिटॅमिन एमचा अर्थात पैशाचा पुरवठा होईल. शनिवारी खोटं बोलू नका!
तूळ:
महत्त्वाच्या गाठी-भेटी होतील चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मोठा शुभ. महत्त्वाचे दूरध्वनी आणि महत्त्वाच्या गाठी-भेटी होतील. ता. दोनचा मंगळवार अनेक कामं फत्ते करणारा. मात्र, जुगार नको. सप्ताहाच्या शेवटी स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक धनलाभ होईल. शनिवारी प्रवासात बेरंग.
वृश्चिक:
कौटुंबिक सुख अनुभवाल फिल्डवर राहा; परंतु चोरट्या धावा काढू नका, नाहीतर धावबाद व्हाल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती कौटुंबिक सुख अनुभवतील. घरात विवाह ठरतील. ता. दोन व तीन हे दिवस तुमच्या राशीला एकूणच शुभ. शनिवारची सकाळ ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभाची.
धनु:
नोकरीत शुभ घटना घडेल सप्ताहाची लय उत्तम राहील. मात्र जुगार टाळा, असत्य बोलू नका, लाच देऊ नका आणि लाच घेऊ नका. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह अनुकूलच. सप्ताहाची सुरवात कौटुंबिक सुवार्तांची. मुला-बाळांचे विवाह ठरतील. नोकरीच्या ठिकाणी शुभघटना घडेल.
मकर:
व्यसनी मित्रांशी संपर्क नको सप्ताहातली बुधाची स्थिती विचित्रच राहील. चोरी- नुकसानी वा फसवणुकीपासून जपा. व्यसनी मित्रांशी संपर्क नको. ता. दोन ते तीन मे हे दिवस अतिशय शुभ. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत लाभ. शनिवारची संध्याकाळ स्त्रीचिंतेची. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रवासात त्रास.
कुंभ:
आर्थिक ओघ प्राप्त होईल आजचा रविवार शुभलक्षणी. व्यावसायिक आर्थिक ओघ प्राप्त होईल. सप्ताहात शततारका नक्षत्राच्या व्यक्ती फॉर्ममध्ये येतील. कलाकारांना ग्लॅमर मिळेल. ता. चार व पाच हे दिवस प्रवाही राहतील. शनिवारी पोट सांभाळा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना संसर्गाची शक्‍यता.
मीन:
इच्छुकांचा विवाह ठरेल सप्ताहाची सुरवात नोकरीतल्या सुवार्तांची. सप्ताहात उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती मॅन ऑफ द मॅच होतील! ता. एक मेचा महाराष्ट्र दिन वैयक्तिक उत्सव- समारंभाचा. आजचा रविवार विवाहेच्छूंसाठी निर्णायक. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवारची संध्याकाळ बेरंग करणारी.

ताज्या बातम्या