ब्रेकिंग न्यूज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी
क्रिकेट: भारताचा पहिला डाव ३३२ धावांवर संपुष्टात

भविष्य

मेष:
महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अपेक्षित गाठीभेटी पडतील.
वृषभ:
नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक क्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन:
जिद्द व चिकाटी वाढेल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवाल.
कर्क:
मानसिक अस्वस्थता राहील. खर्च वाढणार आहेत. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. आजचा दिवस आपणाला फारसा अनुकूल नाही.
सिंह:
आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल.
कन्या:
खर्च वाढणार आहेत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.
तूळ:
प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. अनेकांशी सुसंवाद साधाल.
वृश्चिक:
मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायांमध्ये अपेक्षित प्रगती साध्य होईल. प्रवास सुखकर होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनु:
जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. आरोग्य उत्तम राहील.
मकर:
आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. एखादी गुप्त वार्ता समजेल. व्यवसायातील आर्थिक गुंतवणुकीची कामे यशस्वी होतील.
कुंभ:
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
मीन:
मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. खर्च वाढणार आहेत. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल.
रविवार, मार्च 26, 2017 ते शनिवार, एप्रिल 1, 2017
मेष:
नोकरीत बढतीची चाहूल कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ प्रवास, वाहतूक किंवा जोखमीची कामं आदींसंदर्भात प्रतिकूल. हाता-पायाच्या दुखापती जपा. बाकी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी राशीचा मंगळ सप्ताहाच्या शेवटी विजयाची गुढी उभारणारा. रसिकमित्रांचा सहवास लाभेल. नोकरीत बढतीची चाहूल.
वृषभ:
नव्या वास्तूचा योग नवसंवत्सरातली सतत चर्चेत राहणारी रास. यंदाचा गुढीपाडवा पूर्वसंचित ‘एन्कॅश’ करणारा. नवपरिणितांना सुवार्ता मिळतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना नव्या वाहनाचा, वास्तूचा योग. ता २८ व २९ हे दिवस वृद्धांचं जीवन सार्थकी लावणारे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना व्हिसा मिळेल.
मिथुन:
वाद-विवाद करू नका सप्ताहाचा फळं देण्याचा आवाका प्रचंड राहील. सिर्फ आम आम खाने से मतलब रखो. सार्वजनिक जीवनात कुणाशीही वाद घालू नका. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना यंदाचा गुढीपाडवा अतिशय शुभलक्षणी. रामजपातून दिव्य शक्तींच्या सहवासात राहा. संध्याकाळी भांडणं नकोत. कादगपत्रं जपा.
कर्क:
घरातल्या स्त्रीवर्गाचा भाग्योदय नवसंवत्सर ध्येयपथाकडं वाटचाल करणारं असेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत बलसंपन्न होतील. ता. २८ ते ३० हे दिवस अतिशय शुभसूचक. घरातल्या स्त्रीवर्गाचा भाग्योदय होईल. उत्तम खरेदी. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी दागदागिने जपावेत.
सिंह:
नोकरीत यशोपर्व सुरू होईल सप्ताह उगाचच हुरहूर लावणारा. प्रेमिकांनी गैरसमज टाळावेत. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या मानसिक पातळीवर प्रतिकूल ठरण्याची शक्‍यता. प्रवासातल्या व्यक्तींची चिंता सतावेल. गुढीपाडव्याच्या आसपास पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना झगमगाटी अनुभव येतील. नोकरीत यशोपर्व सुरू होईल. भरगच्च पगारवाढ!
कन्या:
पोलिसांशी हुज्जत टाळा अमावास्येच्या आसपासचं ग्रहमान प्रतिकूल. पैशाचं पाकीट जपा. वाहनांची काळजी घ्या. पोलिसांशी हुज्जत टाळा. हस्त नक्षत्राच्या विवाहेच्छूंचे विवाह जमतील. घरातील तरुणांचा उत्कर्ष होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पित्तप्रकोप. उन्हात हिंडू नका. अनवाणी फिरू नका.
तूळ:
आहार-विहारादी पथ्यं पाळा सप्ताहात मंगळभ्रमणाची स्थिती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण राहील. आहार-विहारादी पथ्यं पाळा. अमावास्येचा काळ वृद्धांसाठी प्रतिकूल. प्रवासात जपा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना भाऊबंदकीचा त्रास. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना गुढीपाडवा मानसन्मानाचा. स्त्रीकडून कौतुक होईल.
वृश्चिक:
स्त्रीचा अवमान करू नका अमावास्या बुध-हर्षल योगातून बाधक ठरण्याची शक्‍यता. दुर्विचार टाळा. व्यसनं सांभाळा. स्त्रीचा अवमान करू नका. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी मानसिक, शारीरिक पथ्यं पाळावीत. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नवसंवत्सरारंभ खास भेट देणारा. नोकरीत भाग्योदय.
धनु:
वाहन काळजीपूर्वक चालवा अमावास्येचं प्रभावक्षेत्र अतिशय खराब. वाहनं किंवा उपकरण जपा. वाहन काळजीपूर्वक चालवा. भाजण्या-कापण्याच्या घटना शक्‍य. बाकी पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नवसंवत्सरारंभ शुभलक्षणांचा. घरातले लांबलेले विवाह ठरतील. काहींचा नव्या वास्तूत प्रवेश होईल.
मकर:
पैशाची देव-घेव जपून करा सप्ताहातली अमावास्या प्रवासात विचित्र अनुभव देणारी. पैशाची देव-घेव जपून करा. एखादी स्त्री अडचणीत आणू शकते. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना नवसंवत्सराचा हा सप्ताह अतिशय भावरम्यतेचा. नोकरीच्या संधी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी जड वस्तू उचलू नयेत. शारीरिक वेदना त्रास देतील.
कुंभ:
वृद्धांशी वाद-विवाद नकोत सप्ताह शुभभ्रमणातून काही विशिष्ट सुंदर फळं देईल. घरातल्या तरुणांचा भाग्योदय होईल. परदेशस्थ मुलांचे प्रश्‍न सुटतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा लाभ. वास्तूविषयक व्यवहार पार पडतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी वृद्धांशी वाद-विवाद करू नयेत.
मीन:
तरुणांना परदेशात नोकरी मिळेल सद्भक्तांना हे नवसंवत्सर निश्‍चितच काही बोध देऊन जाईल. हा सप्ताह उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शुभ ग्रहांच्या माध्यमातून खणखणीत आणि दणदणीत बोलणारा. तरुणांनो, संधीसाठी दबा धरून बसा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशात नोकरी. मात्र नका अडकू प्रेमात!

ताज्या बातम्या