ब्रेकिंग न्यूज

गोंदिया (महाराष्ट्र) : गोंदिया येथील प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमान चालकांच्या विमानाचा बालाघाट येथे अपघात. दोन विमानचालकांचा मृत्यू.
नवी दिल्ली : पराभवाची जबाबदारी स्वीकारून दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी दिला पदाचा राजीनामा.
दिल्लीतील तीनही महापालिकांमधील मिळून एकूण २७२ जागांपैकी भाजपच्या खात्यात १७७ जागा
पराभवानंतर 'आप'ने 'ईव्हीएम'वर फोडले खापर
दिल्लीमधील महापालिका निवडणुकीत भाजपची दणदणीत बहुमताकडे वाटचाल

'Yes we Can, Yes we Did' - ओबामा

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी आज मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी देशाला उद्देशून अखेरचे भाषण केले. त्यांनी या भाषणात अमेरिकन नागरिकांचे आभार मानत, अमेरिकेचे भविष्य सुरक्षित हातात असल्याचे म्हटले.

शिकागो - 'यस वुई कॅन' असे म्हणत आठ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती स्वीकारणाऱ्या बराक ओबामा यांनी आज आपल्या अखेरच्या भाषणात 'यस वुई कॅन', 'यस वुई डीड, थँक यू' असे म्हणत आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा अखेर केला.

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी आज मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी देशाला उद्देशून अखेरचे भाषण केले. त्यांनी या भाषणात अमेरिकन नागरिकांचे आभार मानत, अमेरिकेचे भविष्य सुरक्षित हातात असल्याचे म्हटले. सर्वांनी मिळून मला एक सर्वोत्तम अध्यक्ष बनविल्याचेही ओबामा यांनी सांगितले. यावेळी एका महिलेने झळकाविलेल्या फलकामुळे सर्वांचे लक्ष तिकडे खेचले गेले. या फलकावर तिने आम्हा सर्वांना माफ करा, असे लिहिले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओबामा यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

ओबामा म्हणाले, ''मी आणि मिशेलने अनेकवेळा तुमच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. पण, आता तुम्हाला धन्यवाद म्हणण्याची वेळ आली आहे. मालिया आणि साशा या दोघीही माझ्या आयुष्यात खूप महत्त्वपूर्ण असून, मी त्यांचा पिता असल्याचा मला आदर आहे. मिशेल केवळ पत्नी किंवा मुलांची आईच नाही तर माझी चांगली मैत्रिणही आहे. मला पाठिंबा देणाऱ्या सर्व अमेरिकन नागरिकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य समजतो. अमरिकेचे भविष्य सुरक्षित हातात आहे, याचा मला विश्वास आहे. आपल्या समाजात कोणी फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर हा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. गेल्या आठ वर्षात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. आपली सुरक्षा करण्याची जबाबदारी फक्त अधिकाऱ्यांचे काम नाही. वर्णद्वेषाचा मुद्दा आजही अमेरिकेसाठी एक मोठा आणि भेदभाव निर्माण करणारा आहे.''

सर्वसामान्य नागरिक जेव्हा बदल होण्याची इच्छा व्यक्त करतो आणि त्या प्रक्रियेत सहभागी होतो. तेव्हाच बदल घडून येतो, हे मी शिकलो आहे. तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाली, आता देशाचा नागरिक म्हणून मला थांबायचे नाही. इसिस या दहशतवादी संघटनेविरुद्ध लढण्यासाठी सर्व देश एकत्र आले. त्यामुळे इसिसचे अर्धेतरी साम्राज्य नष्ट करु शकलो आहोत. हवामान बदलाच्या मुद्दावर आमच्या प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात आले, असे ओबामा यांनी सांगितले.

ग्लोबल

बॅंकॉक (थायलंड)- एका पित्याने आपल्या अकरा वर्षाच्या मुलीची हत्या फेसबुकवरून लाईव्ह केली. मुलीच्या हत्येनंतर त्यानेही आत्महत्या...

मंगळवार, 25 एप्रिल 2017

बीजिंग - चीनच्या शिनजियांग या प्रांतामधील बहुसंख्येने असलेल्या उघर मुस्लिम...

मंगळवार, 25 एप्रिल 2017

इस्लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्यात रस नाही. त्यांना पाकसोबत शांतता नकोच आहे, असे...

मंगळवार, 25 एप्रिल 2017