पाकिस्तानमधून घुसणाऱ्या दहशतवाद्यांमुळे चीनला चिंता

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन शिनजियांग प्रांतामध्ये घुसणाऱ्या दहशतवाद्यांकडून चीनमध्ये दहशतवादी कृत्ये घडविण्याची भीती येथील नेतृत्वाने व्यक्त केली आहे. शिनजियांगमधील "होतान'मध्ये नुकत्याच घडविण्यात आलेल्या काही दहशतवादी हल्ल्यांमध्ये चीनची जीवितहानी झाली आहे.

बीजिंग - चीनमध्ये घुसणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्याकरिता चीन व पाकिस्तानमधील सीमारेषेवरील बंदोबस्त आणखी कडक करण्यात येणार असल्याचे वृत्त आज (बुधवार) सूत्रांनी दिले. शिनजियांग या चीनच्या अतिवाव्येकडील प्रांतामधील कम्युनिस्ट नेतृत्वाने यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. शिनजियांग प्रांतामध्ये चीनला दहशतवाद्यांचा विशेष उपद्रव सहन करावा लागत असल्याचे आढळून आले आहे.

पाकिस्तानमधून घुसणाऱ्या या दहशतवाद्यांना रोखण्यात पाक सरकार अपयशी ठरत असल्याने चीनने यासंदर्भात आपली नाराजी अधिक स्पष्टपणे दर्शविल्याचे मानले जात आहे.

पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेऊन शिनजियांग प्रांतामध्ये घुसणाऱ्या दहशतवाद्यांकडून चीनमध्ये दहशतवादी कृत्ये घडविण्याची भीती येथील नेतृत्वाने व्यक्त केली आहे. शिनजियांगमधील "होतान'मध्ये नुकत्याच घडविण्यात आलेल्या काही दहशतवादी हल्ल्यांमध्ये चीनची जीवितहानी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तान-चीन सीमारेषेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीन व पाकिस्तानमध्ये "सर्वकालिक मैत्री'चा दावा केला जात असला; तरी चीनमध्ये इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या धोक्‍यास पाकिस्तानमधूनच फूस मिळत असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे चिनी नेतृत्व चिंताक्रांत असल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, शिनजियांगचे चेअरमन शोहरत झाकीर यांनी

सीमारेषेजवळील बेकायदेशीर दळणवळण रोखण्याकरिता सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. शिनजियांग हे चीनचे दहशतवादाविरोधातील लढाईचे मुख्य युद्धक्षेत्र असल्याची भावना येथील नेतृत्वाने या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली आहे.

ग्लोबल

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर 12 तासांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने सुरु केलेल्या ट्विटर अकाऊंटला तब्बल...

02.03 PM

पेशावर - वायव्य पाकिस्तानमधील पराचिनार येथील बाजारात आज (शनिवार) सकाळी झालेल्या स्फोटात 15 जण ठार झाले असून, 30 जण जखमी आहेत....

12.03 PM

वॉशिंग्टन - "अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा जनतेचे सरकार आले आहे. यापुढे अमेरिकेमध्ये "अमेरिका फर्स्ट' या नव्या दृष्टिकोनातून सरकार...

08.24 AM