त्यांनी रागाने जयललितांच्या स्मारकावर हात का आपटले?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

वंजीनाम उरैथल असे या प्रथेचे नाव आहे. भूमातेच्या साक्षीने शपथ घेण्याची पद्धत आहे. एखाद्या राजाच्या किंवा योद्ध्याच्या मृत्यूचा बदला घेताना सैनिक मृतदेहाच्या तोंडात भाताचा घास भरवून युद्भभूमीवर त्वेषाने जात असत. बदला घेण्यासाठी आम्ही काहीही करू असे कृतीतून दर्शविले जाते.

चेन्नई : व्ही.के. शशिकला यांचे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगल्यावर तुरुंगात जाण्याआधी त्यांनी जयललितांच्या स्मारकाचे दर्शन घेताना त्यावर रागाने हात आपटल्याची कृती सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे.

बंगळूरमधील तुरुंगाकडे रवाना होण्यापूर्वी शशिकला यांनी चेन्नईतील मरीना बीच येथील जयललितांच्या स्मारकाकडे गाडी वळवली. येथील समाधीचे दर्शन घेताना त्यांनी रागाने, त्वेषाने त्या समाधीवर हात आपटला आणि काहीतरी पुटपुटल्या. जयललितांच्या समाधीवर त्या हाताने मारत आहेत असे पाहणाऱ्यांना वाटले. समाधीवर तीनवेळा त्यांनी हात आपटला. त्यावेळी त्या रागाने काही पुटपुटत होत्या. 

हा व्हिडिओ व्हायरल झाला. प्रसारमाध्यमांनी याचे थेट प्रक्षेपण केले. त्यामुळे शशिकला यांनी नेमके काय केले. त्यांच्या या कृतीचा नेमका अर्थ काय याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली. या कृतीला एक ऐतिहासिक परंपरा आहे.
दक्षिण भारतातील योद्धा जमात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धिवर या जातीत शशिकला जन्मलेल्या आहेत. एखाद्या युद्धावर जाताना शत्रुला पराभूत करण्यासाठी जमिनीवर असे हात मारुन आवेशात शपथ घेण्याची परंपरा पूर्वीपासून या जमातीत आहे.

तामिळनाडूच्या इतिहासात अशा परंपरा आहेत. काही ठिकाणी मृत व्यक्तीची हाडं किंवा रक्षा ही बदला पूर्ण होईपर्यंत जपून ठेवली जाते.
शशिकला यांच्याबाबत कट रचणाऱ्यांविरोधात त्यांनी शपथ घेतल्याचे अण्णा द्रमुक पक्षाने ट्विटरवर म्हटले होते. 

कनिष्ठ न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सुनावलेली 4 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने शशिकला अखेर पोलिसांना शरण गेल्या. त्यांनी आपले दोन पुतणे पुन्हा पक्षात आणले. 
 

सकाळ व्हिडिओ

देश

पन्नास कोटींचा नफा कमावल्याचा वद्रांविरुद्ध आरोप नवी दिल्ली: कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका वद्रा...

07.09 AM

कुमार विश्‍वास यांचे "आप'वरच टीकास्त्र नवी दिल्ली: दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्षातून (आप) बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये मोठी...

06.09 AM

आर्थिक वर्षात "डीजीसीईआय'ची कामगिरी नवी दिल्ली: मागील आर्थिक वर्षात सेवाकर आणि उत्पादन शुल्काची 15 हजार 47 कोटी रुपयांची...

05.09 AM