पंजाबचा मुख्यमंत्री पंजाबीच असेल- केजरीवाल

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

नवी दिल्ली- पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आपण मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. पंजाबचा मुख्यमंत्री हा पंजाबमधीलच असेल असे त्यांनी सांगितले. 

या निवडणुकीत अरविंद केजरीवाल हेच पंजाबचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत असे समजून मतदान करा असे आवाहन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले होते. त्यावर केजरीवाल यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

पटियाला येथील एका सभेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "मी दिल्लीचा मुख्यमंत्री असताना पंजाबचा मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो? मुख्यमंत्री हा पंजाबचाच असेल."
आम आदमी पक्षाने अद्याप पंजाबसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. गोव्यामध्ये एल्व्हिस गोम्स हे 'आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. 

मोहाली येथील सभेत सिसोदिया यांनी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीबाबत वक्तव्य केल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले होते. केजरीवाल हे दिल्ली सोडून पंजाबचे मुख्यमंत्री बनणार का याबाबत तर्क-वितर्क करण्यात येत होते. काँग्रेस आणि भाजपसह सर्व विरोधी पक्षांकडून यावर टीका करण्यात आली. 
केजरीवाल हे लबाड आहेत, अशी टीका करीत पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंग यांनी ट्विटरवरून म्हटले होते की, "जर हा प्रकार यशस्वी झालाच तर इतिहासात पहिल्यांदाच हरियान्वी व्यक्ती पंजाबचा मुख्यमंत्री बनेल."
 
देश

श्रीनगर : राजधानी दिल्लीमध्ये 2005 मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी मोहंमद हुसेन फजिली याची मागील आठवड्यात दिल्ली...

11.24 AM

नवी दिल्ली - अमेरिकेतील एका ऑनलाईन शॉपिंग साईटवर गणेशाचे चित्र असलेली बिअर आणि दुसऱ्या एका साईटवर ओम चिन्ह असलेले बूट विक्री होत...

11.00 AM

हैदराबाद : येथील अत्तापूर भागात एका लघुउद्योगाच्या युनिटला भीषण आग लागल्याने त्यामध्ये सहा कामगार भाजून मृत्युमुखी पडले. ...

10.00 AM