लोक मोदींना हटविण्याची संधी शोधत आहेत: खर्गे

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिक प्रचंड अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ते त्यांना (पंतप्रधान नरेंद्र मोदी) काढून टाकण्याची संधी शोधत आहेत. आता यापुढे लोक त्यांना पाठिंबा देणार नाहीत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाचही राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकता येतील आणि लोकांचा पाठिंबा मिळेल असे गृहित धरणे चूकीचे आहे.

मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षासाठी देशातील काही राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका 2014 च्या लोकसभेप्रमाणे नसतील, अशा इशारा देत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्याची संधी शोधत असल्याची टीका त्यांनी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना खर्गे म्हणाले, "नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिक प्रचंड अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ते त्यांना (पंतप्रधान नरेंद्र मोदी) काढून टाकण्याची संधी शोधत आहेत. आता यापुढे लोक त्यांना पाठिंबा देणार नाहीत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाचही राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकता येतील आणि लोकांचा पाठिंबा मिळेल असे गृहित धरणे चूकीचे आहे. नोटाबंदीमुळे देशातील शेतकरी, गरीब, लहान व्यापारी संतापले आहेत. त्यामुळे 2014 च्या लोकसभेएवढे मतदान भाजपला मिळणार नाही. मोदीजींनी जे काही केले आहे ते चुकीचे आहे, याची जाणीव लोकांना होत आहे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेसने नोटाबंदीच्या निर्णयाला "गैरव्यवहार' असे म्हणत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी हे प्लॅस्टिकच्या चलनाचे सेल्समन असल्याचे विधान त्यांनी केले असून, जनता आता प्लॅस्टिक खाणार का, असा सवालही केला आहे.

देश

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हायटेक यंत्रणा तयार केली आहे....

03.15 PM

कोट्टयम : 'केरळमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले सुरुच...

11.33 AM

श्रीनगर : जोरदार हिमवृष्टीमुळे काश्‍मीर खोऱ्यातील बहुतांश भागाचा संपर्क तुटला आहे. गेल्या तीन दिवसांपासून काश्‍मीरमध्ये...

11.27 AM