मी पक्ष वाचवतोय- मुलायमसिंह

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

नवी दिल्ली- समाजवादी पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे पक्षाचे कार्यकर्ते काळजीत आहेत. सर्वांना पक्ष एकसंघ राहावा असे वाटत असून, पक्ष वाचविण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी आज (बुधवार) म्हटले आहे.

शिवपाल यादव यांचे नाव न घेता मुलायमसिंह म्हणाले, 'अन्यथा आम्ही वेगवेगळ्या पक्षांची स्थापना करू. परंतु, पक्षाचे चिन्ह बदलणार नाही. 'सायकल' हे पक्षाचे अधिकृत चिन्ह आहे. या चिन्हाशी कार्यकर्त्यांचे एक नाते आहे. सर्वांनाच पक्ष एकसंघ राहावा असे वाटत आहे. यादृष्टीनेच प्रयत्न सुरू असून, पक्ष वाचविण्याचा प्रयत्न करतोय.'

'पक्ष स्थापनेपासून ते आजपर्यंत पक्षासाठी खूप कष्ट घेतले आहेत. पक्षाबद्दल कार्यकर्त्यांना वाटत असलेली काळजी मला समजत आहे. तुम्हाला आश्वासन देतो की पक्षात फूट पडू देणार नाही. मी कोणाचे नाव घेणार नाही. परंतु, काहीजण पक्षात फूट पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत,' असेही मुलायमसिंह म्हणाले.

देश

नवी दिल्ली - राजधानीतील ऐतिहासिक तीन मूर्ती चौक आणि तीन मूर्ती मार्ग आता या पुढे "तीन मूर्ती हैफा चौक' आणि "तीन मूर्ती हैफा मार्ग...

02.24 AM

लखनौ - दहशतवादाच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या उत्तर प्रदेशातील अनेक तरुणांना योग्य मार्गावर परत आणण्यासाठी आता दहशतवादविरोधी पथकाने...

01.42 AM

नवी दिल्ली - भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांचे कॉंग्रेस नेते गुरदास कामत यांनी एका निवेदनाद्वारे खंडन केले आहे. आपल्याला...

01.09 AM